Jiah Khan: टॉर्चर ते गर्भपात, जिया खाननं सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीवर केले होते गंभीर आरोप; अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 10 वर्षात काय घडलं?
जिया खाननं (Jiah Khan) 2013 मध्ये आत्महत्या केली. तिनं आत्महत्येपूर्वी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात तिनं काय लिहिलं होतं? जियाच्या आत्महत्येनंतर दहा वर्षात काय घडलं? याबाबत जाणून घेऊयात...
Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर करणार आहे. जिया खान हिने 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आता जिया खानच्या मृत्यूप्रकरणावर स्पेशल सीबीआय कोर्ट काय निकाल देईल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जिया खाननं 2013 मध्ये आत्महत्या केली. तिनं आत्महत्येपूर्वी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात तिनं काय लिहिलं होतं? जियाच्या आत्महत्येनंतर दहा वर्षात काय घडलं? याबाबत जाणून घेऊयात...
2013
3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.जिया खानच्या घरातून सहा पानांची सुसाईड नोट सापडली. सीबीआयला मिळालेल्या जियाच्या या पत्रात सूरज पांचोलीवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जियानं गर्भपाताचा देखील उल्लेख या पत्रात केला होता.
जियाच्या मृत्यूच्या काही आठवड्यांनंतर, तिच्या घरातून जप्त केलेल्या सहा पानी पत्राच्या आधारे सूरज पांचोलीवर “आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल” गुन्हा दाखल करण्यात आला. जिया खानची आई राबिया यांनी त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे कोर्टात सांगितले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण फाशी हे असल्याचे स्पष्ट झाले होते. जुलैमध्ये सूरज पांचोलीला जामीन मंजूर करण्यात आला होता. पण त्याला पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर राबिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी न्यायालयात विनंती केली.
2014
जिया खानच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर सीबीआयने मुंबई पोलिसांकडून तपास घेण्याची मागणी करणारी राबिया यांची याचिका न्यायालयाने मान्य केली. आदित्य पांचोलीने राबिया यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता.
2015
2015 मध्ये मे महिन्यात सूरज पांचोलीच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता आणि नंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल डिसेंबरमध्ये सूरज पांचोलीविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
2016
2016 मध्ये, सीबीआयने जिया खानच्या मृत्यूचे कारण फाशी असल्याचे सांगत, हत्येची कोणतीही शक्यता नाकारली.
2017
2017 मध्ये, न्यायालयाने सीबीआयच्या चौकशीविरोधात राबिया यांनी केलेली याचिका फेटाळली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची रबिया यांची मागणी देखील न्यायालयानं फेटाळली. राबिया यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. त्यानंतर सूरज पांचोलीने मुंबई उच्च न्यायालयाला खटला जलदगतीने चालविण्याची विनंती केली.
2018
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सूरज पांचोलीच्या विरोधात अधिक तपास करण्याची विनंती फेटाळली.
2021
जिया खान मत्यूप्रकरणाचा खटला विशेष सीबीआय न्यायालयाकडे 2021 मध्ये पुन्हा सोपवण्यात आला.
2022
2022 मध्ये या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी करणाऱ्याची मागणी करणारी राबिया यांची दुसरी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
2023
जिया खानच्या आत्महत्येला 10 वर्ष पूर्ण झाली. जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर करणार आहे.