'थँक गॉड' मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ अन् अजय देवगणनं घेतलं एवढं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांची फी
थँक गॉड (Thank God) या चित्रपटात काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
!['थँक गॉड' मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ अन् अजय देवगणनं घेतलं एवढं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांची फी jay devgn and sidharth malhotra charge this amount fee for thank god film 'थँक गॉड' मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ अन् अजय देवगणनं घेतलं एवढं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांची फी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/15/fa638a061cfbbd699a07b5bee58aea601663240363451259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Thank God : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) थँक गॉड ( Thank God) या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. अजयसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात कलाकारांच्या मानधनाबाबत...
कलाकारांचे मानधन
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, थँक गॉड या चित्रपटाची निर्मिती 60 ते 70 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. अजय देवगणनं या चित्रपटात काम करण्यासाठी 35 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर सिद्धार्थनं या चित्रपटासाठी सात कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं थँक गॉड चित्रपटातील भूमिकेसाठी तीन कोटी फी घेतली आहे. अभिनेत्री नोरा फतेही देखील या चित्रपटात छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. थँक गॉड चित्रपटामध्ये अजय हा चित्रगुप्त ही भूमिका साकारणार आहे तर सिद्धार्थ हा अशा एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याच्यासोबत चित्रगुप्त हा गेम ऑफ लाईफ खेळणार आहे
कधी रिलीज होणार थँक गॉड चित्रपट?
थँक गॉड हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. थँक गॉड या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकरे, सुनीर खेतरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडित आणि मार्कंड अधिकारी यांनी केली असून यश शाह सहनिर्माते आहेत. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटामधील सिद्धार्थ आणि रकुलची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अजयच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अजय त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. थँक गॉडसोबत अजयचे चाणक्य, दृश्यम 2, मैदान, रेड 2 आणि सिंघम 3 हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याच्या सिंघम, दृष्यम, तान्हाजी आणि आरआरआर या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)