Janhit Mein Jaari Box Office Collection : नुसरत भरुचाच्या 'जनहित में जारी'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी केली दुप्पट कमाई
Janhit Mein Jaari : 'जनहित में जारी' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Janhit Mein Jaari Box Office Collection : नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) आणि अनुद सिंहचा (Anud Singh) 'जनहित में जारी' (Janhit Mein Jaari) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली नव्हती. पण आता रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने दुप्पट कमाई केली आहे.
'जनहित में जारी' या सिनेमाने शुक्रवारी 43 लाखांची कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने दुप्पट कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 82 लाखांची कमाई केली आहे. तरण आदर्शने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 1.25 कोटींची कमाई केली आहे.
'जनहित में जारी' या सिनेमाची कथा नीति नावाच्या एका मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. नुसरत भरूचाने नीतिचे पात्र साकारले आहे. या सिनेमाचे कथानक आजच्या काळावर भाष्य करणारे आहे. विकेंडला हा सिनेमा चांगला गल्ला जमवेल, असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
जय बसंतू सिंह यांनी 'जनहित में जारी' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर या सिनेमात नुसरत भरुचाचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विजय राज, परितोष त्रिपाठी, टीनू आनंद, बिजेंद्र कला आणि नेहा सराफ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे नेटकरी हा सिनेमा फ्लॉप होईल अशी शक्यता वर्तवत आहेत. या सिनेमात नुसरतच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या