Independence Day 2023: रॉकेट बॉईज ते रेजिमेंट डायरीज; यंदा स्वातंत्र्य दिनाला ओटीटीवर या वेब सीरिज नक्की बघा
Independence Day 2023: 15 ऑगस्टला या वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
Independence Day 2023: स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 15 ऑगस्टला प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना असते. अशा वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात ज्यामध्ये देशभक्तीची भावना दाखवण्यात आली आहे.
द फॅमिली मॅन- सीजन 1 आणि 2 (The Family Man)
द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये अशा एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे आहे जो राष्ट्रीय तपास संस्थेसाठी काम करतो . या वेब सीरिजचे दोन सीझन आहेत. तुम्ही ही वेब सीरिज Amazon Prime वर पाहू शकता. मनोज वाजपेयी यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
रॉकेट बॉईज (Rocket Boys)
रॉकेट बॉईज (Rocket Boys) या सीरिजमध्ये डॉ होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांची कथा दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणातील त्यांचे योगदान दाखण्यात आले आहे.
View this post on Instagram
स्पेशल OPS (Special OPS) आणि OPS ऑप्स 1.5- द हिम्मत स्टोरी (Special Ops 1.5: The Himmat Story)
स्पेशल OPS आणि OPS ऑप्स 1.5 या वेब सीरिजमध्ये हिम्मत सिंह आणि त्याच्या टीमची कथा दाखवण्यात आली आहे, जे भारतीय गुप्तचर संस्थेचा भाग आहेत. के के मेनन अभिनीत आणि नीरज पांडे दिग्दर्शित ही सीरिज तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
अवरोध (Avrodh)- सीजन 1 आणि 2
अवरोध- सीजन 1 आणि 2 ही सीरिज पॅरा एसएफ लीडर मेजर विदीप सिंह यांच्यावर आधारित आहे. ही वेब सीरिज तुम्ही सोनी लाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
रेजिमेंट डायरीज (Regiment Diaries)
भारतीय सैन्य हे अनेक रेजिमेंटचे कुटुंब आहे, प्रत्येकाचा स्वतःचा इतिहास, ओळख आणि गौरवशाली परंपरा आहेत. रेजिमेंट डायरी ही भारतीय सैन्याची कथा आहे . ही सीरिज तुम्ही Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: