एक्स्प्लोर
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनची 'मिर्जिया'तून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, टीझर लॉन्च

मुंबई : अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. हर्षवर्धनच्या 'मिर्जिया' सिनेमाचा टीझर लॉन्च केला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, मिर्झा-साहिबा यांच्या प्रेमकथेवर आधारित हा सिनेमा आहे.
अभिनेत्री सैयामी खेरही हर्षवर्धन कपूरसोबत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनुज आणि अंजलीही आपलं करिअर अजमावू पाहत आहेत.
'मिर्जिया' सिनेमाचा टीझर पाहिल्यावर सिनेमा ग्रामीण भागात चित्रित केला असून, सैयामीने खेड्यातील तरुणीची भूमिका साकारली आहे, तर हर्षवर्धनचा पूर्ण लूक टीझरमधून तर प्रेक्षकांना पाहता येणार नाही. मात्र, सैयामी आणि हर्षवर्धन यांच्यातील किसिंग सीन टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. पाहा टीझर:
अभिनेत्री सैयामी खेरही हर्षवर्धन कपूरसोबत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनुज आणि अंजलीही आपलं करिअर अजमावू पाहत आहेत.
'मिर्जिया' सिनेमाचा टीझर पाहिल्यावर सिनेमा ग्रामीण भागात चित्रित केला असून, सैयामीने खेड्यातील तरुणीची भूमिका साकारली आहे, तर हर्षवर्धनचा पूर्ण लूक टीझरमधून तर प्रेक्षकांना पाहता येणार नाही. मात्र, सैयामी आणि हर्षवर्धन यांच्यातील किसिंग सीन टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. पाहा टीझर: आणखी वाचा























