Simrat Kaur Intimate Pics: 'गदर 2' फेम अभिनेत्रीच्या इंटिमेट सीनचे फोटो पाहून भडकले नेटकरी; अमिषा पटेल म्हणाली...
अभिनेत्री सिमरत कौरचे (Simrat Kaur) काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Simrat Kaur Intimate Pics: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाबाबत नवा वाद समोर आला आहे. 'गदर 2' या चित्रपटात सनी आणि अमिषाच्या सून भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सिमरत कौरचे (Simrat Kaur) काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेक नेटकरी सिमरत कौरला ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला आता अमिषानं उत्तर दिलं आहे.
सिमरत कौरचे एका चित्रपटातील बोल्ड सीनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिमरत कौरचे हे फोटो एका नेटकऱ्यानं त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोला त्या नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं, "आम्ही सर्व चाहते प्रार्थना करतो की, या सिमरत कौरला 'गदर 2' सारख्या प्युअर चित्रपटात मोठी भूमिका मिळू नये, आम्ही या चित्रपटात अमिषा पटेल आणि सनी देओल पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत."
Spent the entire evening 2day defending the negativity sorrounding Simrat Kaur who is paired opp Utkarsh Sharma in GADAR 2!! Being a girl I request all to only spread positivity n not shame a girl! Lets encourage new talent !! 👍🏻👍🏻
— ameesha patel (@ameesha_patel) July 12, 2023
अमिषा पटेलने नेटकऱ्याच्या या ट्वीटला उत्तर दिलं आहे. तिनं रिप्लाय देत लिहिलं, "गदर नेहमीच गदर असेल... याबद्दल कोणाताही दुसरा विचार करु नका"
दुसऱ्या ट्वीटमध्ये अमिषानं लिहिलं, 'GADAR 2 मध्ये उत्कर्ष शर्मासोबत काम केलेल्या सिमरत कौरच्या नकारात्मकतेचा बचाव करण्यासाठी मी बराच वेळ घालवला!! एक मुलगी म्हणून मी सर्वांना विनंती करतो की फक्त सकारात्मकता पसरवा. नवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊया !'सिमरत कौर गदर-2 या चित्रपटात उत्कर्षच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटात अमिषानं सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या