Anil Sharma On Seema Haider: 'ती फिमेल तारा सिंह'; प्रेमासाठी पाकिस्तान सोडून आलेल्या सीमा हैदरबद्दल 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक काय म्हणाले?
गदर या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी एका मुलाखतीमध्ये सीमाबद्दल सांगितलं.
Anil Sharma On Seema Haider: प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेली सीमा हैदर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सीमाची ही कथा चित्रपटापेक्षा कमी नाही. सीमाची ही गोष्ट ऐकल्यावर अनेकांना गदर (Gadar) या चित्रपटाची आठवण येईल. गदर या चित्रपटात तारा सिंह हा पत्नी आणि मुलासाठी पाकिस्तानात गेला होता. लवकरच गदर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी एका मुलाखतीमध्ये सीमाबद्दल सांगितलं.
काय म्हणाले अनिल शर्मा?
एका मुलाखतीमध्ये अनिल शर्मा यांनी सीमा हैदर आणि गदर चित्रपट या विषयावर चर्चा केली. त्यांनी सीमाचे कौतुक करत म्हटलं की, 'ती खूप धाडसी आहे. आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी ती भारतात आली होती. त्या मुलाने सीमाला मुलांसह स्वीकारले. प्रेमासाठी ती एवढी लांब आली आहे, तिचे इथे स्वागतच व्हायला हवे.'
अनिल शर्मा यांनी सीमाला फिमेल तारा सिंह असं म्हटले. ते म्हणाले,'त्या मुलीला मी तारा सिंहची फिमेल व्हर्जन म्हणतो. तिची हिंमत इतकी होती की, ती कोणाचीही पर्वा न करता इथे आली. हे सोपे नाही. चित्रपट पाहिल्यानंतर कदाचित ती प्रेमात पडली नसेल, पण चित्रपट पाहिल्यानंतर तिला तारा सिंगकडून हिंमत नक्कीच मिळाली असेल. ते करू शकतात तर मी का नाही करू शकत, असा विचार तिनं केला असेल.'
सीमा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी
सीमा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. यानंतर दोघांनीही लग्नासाठी संबंधित वकिलाशी चर्चा केली असता सीमाकडे व्हिसा नसून ती बेकायदेशीरपणे भारतात आल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर, वकिलाच्या तक्रारीवरून सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही जामीन मिळाला आहे.
गदर-2 कधी होणार रिलीज?
गदर-2 हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सनी देओल, अमीषा पटेल या कलाकरांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या