Parineeti Chopra And Raghav chadha: सिंदूर, मंगळसूत्र अन् बांगड्या, नववधू परिणीतीचा खास लूक; लग्नानंतर दिल्लीमध्ये स्पॉट झाले नवविवाहित जोडपे

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Sep 2023 07:49 PM
Swara Bhasker and Fahad Ahmad: स्वरा भास्कर आणि फहाद अहमद झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, बाळाचं नाव माहितीये?
स्वरानं गोडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवले आहे. Read More
Parineeti Chopra And Raghav chadha: सिंदूर, मंगळसूत्र अन् बांगड्या, नववधू परिणीतीचा खास लूक; लग्नानंतर दिल्लीमध्ये स्पॉट झाले नवविवाहित जोडपे
Parineeti Chopra And Raghav chadha: लग्नसोहळा पार पडल्यानंतर परिणीती आणि राघव हे दिल्लीमध्ये स्पॉट झाले आहेत.या नवविवाहित जोडप्याचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले. Read More
Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत
अक्षय कुमारच्या (Akshya Kumar)  'मिशन रानीगंज' (Mission Raniganj) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Aata Hou De Dhingana: भन्नाट टास्क आणि कलाकारांची मजा मस्ती; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Aata Hou De Dhingana: सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More
Shah Rukh Khan: कधी लालबागच्या दरबारी, कधी वैष्णोदेवीच्या चरणी, किंग खान इमेज मेकओव्हर करतोय?
Shah Rukh Khan: शाहरुख हा देवदर्शनाच्या माध्यमातून आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  Read More
Telly Masala : बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर ते दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा!’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Prajakta Mali: ...म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले पैसे; अभिनेत्रीनं सांगितला लंडनमधील शूटिंगचा किस्सा
Teen Adkun Sitaram: तीन अडकून सीताराम या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. लंडनमध्ये शूटिंगदरम्यान आलेला अनुभव प्राजक्ता माळीनं सांगितला आहे.  Read More
Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: मनीष मल्होत्राने डिझाइन केला परिणीतीचा ब्रायडल लेहंगा; काय आहे खास? जाणून घ्या
Parineeti Chopra And  Raghav Chadha Wedding: मनीषनं सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीतीचा लूक आणि ब्रायडल लेहंगा याबाबत माहिती दिली आहे. Read More
Saba Azad Pregnant : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद प्रेग्नंट? पोस्ट पाहून चाहते म्हणाले,"आधी लग्न तर करा"
Saba Azad Pregnant : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आई होणार असल्याची चर्चा आहे. Read More
Shantit Kranti 2 Trailer: तीन मित्रांची बॅचलर ट्रीप; 'शांतीत क्रांती सीझन 2' चा भन्नाट ट्रेलर रिलीज
Shantit Kranti 2 Trailer: शांतीत क्रांती सीझन 2 चा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Parineeti Chopra Raghav Chadha Reception : एक नाही तर तीन ठिकाणी होणार परिणीती-राघव यांचं ग्रँड रिसेप्शन
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं दोन ठिकाणी ग्रँड रिसेप्शन होणार आहे Read More
Parineeti Chopra Raghav Chadha :: ....म्हणून प्रियांका चोप्रा परिणीतीच्या लग्नाला होती गैरहजर; देसी गर्लच्या आईनं सांगितलं कारण
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) ही परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्यामध्ये गैरहजर होती. Read More
Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस
एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chava) या आगामी चित्रपटाची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. Read More
Satyashodhak : 'सत्यशोधक' सिनेमाचा टीझर रिलीज; महात्मा ज्योतिराव-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर उलगडणार
Satyashodhak Teaser Out : 'सत्यशोधक' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Parineeti Chopra Raghav Chadha : पहिली भेट ते लगीनगाठ; नववधू परिणीतीची लग्नानंतरची पहिली पोस्ट
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More
Nana Patekar : नाना पाटेकरांनी नाकारलेला हॉलिवूडपट; म्हणाले,"दहशतवाद्याची भूमिका करणार नाही"
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी एका हॉलिवूडपटाची ऑफर नाकारली होती. Read More
Shreya Bugade : बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Shreya Bugade : श्रेया बुगडेने बाप्पाला निरोप दिल्यानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. Read More
Chandramukhi 2 : 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर आऊट! कंगना रनौतच्या रौद्र रुपाने वेधलं लक्ष
Chandramukhi 2 : कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) आगामी 'चंद्रमुखी 2' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Parineeti-Raghav Wedding First Photo : परिणीती-राघव अखेर अडकले लग्नबंधनात; लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.