Parineeti Chopra Raghav Chadha Reception : एक नाही तर तीन ठिकाणी होणार परिणीती-राघव यांचं ग्रँड रिसेप्शन
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं दोन ठिकाणी ग्रँड रिसेप्शन होणार आहे
Parineeti Chopra Raghav Chadha Reception : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता त्यांच्या ग्रँड रिसेप्शनकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सहभागी झाले होते. तसेच हरभजन सिंह आपल्या पती आणि मुलांसह उपस्थित होते. तसेच सानिया मिर्जा आणि मनीष मल्होत्रा यांनीदेखील हजेरी लावली होती. पण या लग्नसोहळ्यात बॉलिवूडकरांनी मात्र हजेरी लावली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव यांनी दोन रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. एक दिल्लीत आणि एक मुंबईत रिसेप्शन पार पडेल. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनला राजकीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तर बॉलिवूडकरांसाठी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सोमवारी उदयपूरहून रवाना होणार आहेत. परिणीतीचा 'मिशन रानीगंज' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नानंतर अभिनेत्री आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'मिशन रानीगंज' हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सत्यघटनेवर आधारित या सिनेमात अक्षय कुमारदेखील (Akshay Kumar) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
परिणीती आणि राघव चड्ढा 24 सप्टेंबर 2023 रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. परिणीती आणि राघव यांनी लग्नसोहळ्यासाठी खास आऊटफिट परिधान केला होता.
परिणीती-राघव यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या लग्नपत्रिकेवर लिहिलेलं होतं की,"राघव चड्ढा यांचे आई-वडील अलका आणि सुनील चड्ढा यांच्यावतीने तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 रोजी ताज येथील चंडीगढ येथे राघव आणि परिणीती यांच्या रिसेप्शनसाठी निमंत्रित करत आहोत". त्यामुळे आता परिणीती आणि राघव यांचं तीन ठिकाणी रिसेप्शन होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या