एक्स्प्लोर
Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: मनीष मल्होत्राने डिझाइन केला परिणीतीचा ब्रायडल लेहंगा; काय आहे खास? जाणून घ्या
Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: मनीषनं सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीतीचा लूक आणि ब्रायडल लेहंगा याबाबत माहिती दिली आहे.

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding
Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याच्या फोटोमधील परिणीतीच्या ब्रायडल लूकन अनेकांचे लक्ष वेधले आहे. परिणीतीचा ब्रायडल लेहंगा हा डिझायनर मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाइन केला आहे. मनीषनं सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीतीचा लूक आणि ब्रायडल लेहंगा याबाबत माहिती दिली आहे.
मनीष मल्होत्राची पोस्ट
परिणीतीने लग्नसोहळ्यात परिधान केलेला ब्रायडल लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल 2500 तास लागले, अशी माहिती मनीष मल्होत्राने सोशल मीडियावरील शेअर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली. त्यानं परिणीतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "विंटेज सोन्याचा धागा आणि विविध पॅटर्नचा वापर लेहंगा तयार करताना करण्यात आला आहे. लेहंगा तयार करताना मोत्यांचा वापर देखील करण्यात आला. " परिणीतीने लग्नसोहळ्यात परिधान केलेल्या लेहंग्याच्या ओढणीवर राघवचं नाव लिहिले होते.
परिणीतीने लग्नसोहळ्यात मनीष मल्होत्रानेच डिझाइन केलेली ज्वेलरी परिधान केली होती. परिणीतीने लग्नसोहळ्यात परिधान केलेल्या मांग टिक्का, कानातले आणि नेकलेस या ज्वेलरीबाबत देखील देखील मनीषनं पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
View this post on Instagram
परिणीतीनं लग्नसोहळ्यासाठी पेस्टल कलरचा लेहंगा आणि ग्रीन कलरची स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता. तसेच राघवनं व्हाईट शेरवानी, फेटा आणि ब्राऊन कलरची मोजडी असा लूक केला होता.
परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,"नाश्त्याच्या टेबलावर आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे".
संबंधित बातम्या:
आणखी वाचा























