Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस
एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी ‘शिवरायांचा छावा’ (shivrayancha chhava) या आगामी चित्रपटाची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
Digpal Lanjekar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय, चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटामधील डायलॉग्स या सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. सुभेदार चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) असं आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करुन दिग्पाल लांजेकर यांनी या आगामी चित्रपटाची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
दिग्पाल लांजेकर यांची पोस्ट
दिग्पाल लांजेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आलेली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं-
"उजळला तेजाने, पुरंदराचा माथा
सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा
शत्रू होई परास्त,
असा ज्याचा गनिमी कावा
शिवशंभूचा अवतार जणू
अवतरला ‘शिवरायांचा छावा’
छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा!’ सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. ‘शिवरायांचा छावा,’16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात!"
View this post on Instagram
'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटानंतर आता दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा,’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली. तर चिन्मय मांडलेकर यानं या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. ‘सुभेदार’ या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि 'मावळं जागं झालं रं...' या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सुभेदार या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ हे गाणं दिग्पाल लांजेकर यांनी अवघ्या पाच मिनिटात लिहिलं आहे.
संबंधित बातम्या: