Parineeti-Raghav Wedding First Photo : परिणीती-राघव अखेर अडकले लग्नबंधनात; लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत.
![Parineeti-Raghav Wedding First Photo : परिणीती-राघव अखेर अडकले लग्नबंधनात; लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल Parineeti Chopra Raghav Chadha Finally Tie the Knot Udaipur see pics other details Wedding First Photo Viral On Social Media Bollywood Entertainment Parineeti-Raghav Wedding First Photo : परिणीती-राघव अखेर अडकले लग्नबंधनात; लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/a09d89a567fbbf03153144eafc49144f1695605839123254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding First Photo : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे (AAP) खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकले आहेत. आता लग्नानंतरचा त्यांचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परिणीती-राघवचा लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल
परिणीती आणि राघव यांचा लग्नानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये परिणीतीने गुलाबी रंगाची वेस्टर्न साडी आणि राघव चड्ढा काळ्या रंगाच्या वेस्टर्न सूटमध्ये दिसत आहेत. परिणीतीच्या भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या आहेत. फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. परिणीती आणि राघव यांचा हा फोटो रिसेप्शनदरम्यानचा आहे.
View this post on Instagram
परिणीती आणि राघव यांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर ते रिलेशनमध्ये असल्याची चर्चा रंगली. पण दोघांनीही यावर मौन बाळगलं. 13 मे 2023 रोजी साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. खास थीम, प्रमुख पाहुणे आणि हटके लूक करत त्यांनी साखरपुडा उरकला. त्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 24 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी चार वाजता ते लग्नबंधनात अडकले.
परिणीती झाली चड्ढा कुटुंबाची सून
परिणीती आता चड्ढा कुटुंबाची सून झाली आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला आहे. उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नानंतर ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.
परिणीती-राघव यांच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांची मांदियाळी
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. तसेच क्रिकेटर हरभजन सिंह, सानिया मिर्जा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीदेखील हजेरी लावली. बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी परिणीतीची बहीण प्रियंका चोप्रा मात्र या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हती.
पाठवणीच्या वेळी परिणीतीला अश्रू अनावर
पाठवणीदरम्यानचा परिणीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीला अश्रू अनावर झालेले दिसत आहेत. पाठवणीदरम्यान 'दूल्हे का सहरा' आणि 'कबीरा' ही गाणी वाजली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता चंदीगढमध्ये परिणीती-राघव यांचं रिसेप्शन होणार आहे. परिणीती-राघव यांना सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांसह चाहतेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा, परिणीती झाली चड्ढा कुटुंबाची सून, नांदा सौख्य भरे, लक्ष्मी-नारायणाचा जोडा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या
Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमातील पहिला फोटो समोर; थोड्याच वेळात अडकणार लग्नबंधनात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)