Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत
अक्षय कुमारच्या (Akshya Kumar) 'मिशन रानीगंज' (Mission Raniganj) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
![Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत Mission Raniganj Trailer Is Out akshya kumar and parineeti chopra starrer film Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/25/00803cb2ad4dca40a2abfe083b1f59481695647735917259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mission Raniganj Trailer: अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshya Kumar) 'मिशन रानीगंज' (Mission Raniganj) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे, असं म्हटलं जात आहे. इंजिनियर सरदार जसवंत सिंह यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेक कामगारांचे प्राण कसे? वाचवले हे मिशन रानीगंज चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर एखाद्या सिनेमॅटिक ट्रीटप्रमाणे दिसत आहे.
'मिशन रानीगंज' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राची देखील एक छोटीशी झलक पाहायला मिळते.'मिशन रानीगंज' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा दमदार अभिनय पहायला मिळत आहे.
'मिशन रानीगंज' चित्रपटाची कथा 1998 मधील घडलेल्या घटनेवर आधारित आहे. ज्यावेळी पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत काही मजुर अडकले होते. या घटनेनं संपूर्ण देश हादरला. त्यानंतर जसवंत सिंह गिल यांनी अडकलेल्या 65 लोकांचे प्राण वाचवले. आपल्या जिवाची पर्वा न करता जसवंत सिंह यांनी सर्व मजुरांना संकटातून वाचवण्याचा निर्धार केला.
अक्षय कुमारनं 'मिशन रानीगंज' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "सरदार जसवंत सिंह गिल जी, हा ट्रेलर तुमच्या स्मरणार्थ, तुमच्या धैर्याला सलाम." अक्षय कुमारनं शेअर केलेल्या ट्रेलरला कमेंट करुन अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
मिशन रानीगंज कधी होणार रिलीज?
'मिशन रानीगंज' या चित्रपटात अक्षय कुमार हा जसवंत सिंह गिल यांची भूमिका साकारणार आहे. 'मिशन रानीगंज' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयची धमाकेदार एन्ट्री बघायला मिळत आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 6 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'मिशन रानीगंज' या चित्रपटासोबतच अक्षयच्या वेलकम टू द जंगल या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. वेलकम टू द जंगल या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, इनाम कुमार, कृष्णा अभिषेक. झाकीर हुसेन, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि वृही कोडवारा हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Akshay Kumar : India VS Bharat दरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय; 'Mission Raniganj'ची टॅगलाईन बदलली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)