मुंबई : शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते आणि आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर पक्षाच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालानतंर आता ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशा शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचाही समावेश आहे. त्यामुळे, आता पुन्हा राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये मतभेद असल्याची बोललं जात आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांची किंवा आमदार, खासदारांची सुरक्षा ठरवण्यासाठी एक समिती असते, या समितीकडूनच आमदारांच्या सुरक्षेचा वाढवा घेऊन त्यांना सुरक्षा पुरवली जाते, असे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj desai) यांनी म्हटलं आहे. तसेच, नेत्यांची सुरक्षा काढण्यामागे सरकारचा कुठलाही उद्देश नसल्याचं त्यांनी सूचवलं आहे.   


सुरक्षा कमी करणे आणि वाढवणे ही प्रक्रिया निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. याबाबतची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची एक समिती आहे, त्यांच्याकडून दर 6 महिन्यातून एकदा सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतला जातो. त्यामध्ये, या व्यक्तीला, नेत्याला जास्त धोका आहे, त्यांनाच सुरक्षा कायम केली जाते आणि धोका कमी झाल्याचं समोर येतच ती सुरक्षा कमी केली जाते, अशी माहिती पर्यटनमंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूरा देसाई यांनी दिली. सुरक्षा ही पक्षावर किंवा त्याच्या कोठ्याचर नाही तर संबंधितांना किती धोका आहे यावर अवलंबुन आहे.


अनेक आमदार मंत्री यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं‌ लागतं, त्यावेळी स्थानिक पोलीस त्यावेळी सुरक्षा देतात. मला 1997 पासून सुरक्षा आहे. गृहराज्यमंत्री झाल्यानंतर मला वाय प्लस सुरक्षा मिळाली आहे. मात्र, गरज वाटत असेल तर माझ्या परिवाराचा आणि माझ्या सुरक्षेचा आढावा घ्यायचा असेल तर पोलिस प्रमुखांनी तो घ्यावा, अशी विनंती मी करणार आहे असेही शंभूराज देसाई यांनी म्हटलं. सुरक्षा ही पक्षावर किंवा त्यांच्या कोठ्यावर नाही तर संबंधितांना किती धोका आहे, यावर अवलंबून आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.   


मंत्रिमंडळ बैठकीला मी ऑनलाईन हजर


मी आज कॅबीनेट बैठकिला हजर नव्हतो. मात्र, मी या बैठकीला  ऑनलाईन हजर राहिलो होतो. माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचे कार्यक्रम ठेवले आहेत, त्यांचं नियोजन करायचं असल्यामुळं मी आज बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या परवानगीनेच मी ऑनलाईन हजर राहिलो होतो, अशी माहितीही मंत्री देसाई यांनी दिली. 


हेही वाचा


कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले