एक्स्प्लोर

Shreya Bugade : बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Shreya Bugade : श्रेया बुगडेने बाप्पाला निरोप दिल्यानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Shreya Bugade Post On Ganapati Bappa Visarjan : राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. नेते मंडळी, सेलिब्रिटीही अनेक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचं दर्शन घेत आहेत. सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणराय विराजमान झाले आहेत. बाप्पा आल्यावर सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण होतं. पण बाप्पाला निरोप देताना मात्र सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही भावूक होतात. अभिनेत्री श्रेया बुगडेलाही (Shreya Bugade) बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर झाले आहेत. 

श्रेया बुगडेची पोस्ट काय? (Shreya Bugade Post)

बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर झाले असून तिने भावूक पोस्ट शेअर केली आहे. श्रेया बुगडेने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"काल 'निरोप घेता आता आम्हा आज्ञा असवी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असवी', असे म्हणत तुझा निरोप घेतला आणि नेहमीसारखे अश्रू अनावर झाले". 

View this post on Instagram
 
A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेयाने पुढे लिहिलं आहे,"गेल्या इतक्या वर्षात या पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही. पण एक सांगेन या पाच दिवसात तुझ्या येण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही. तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात. तुझं कौतुक करतात..तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो...ही प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव...तुझी सेवा करायची संधी आम्हाला देत राहा". 

श्रेया बाप्पाला म्हणते,"विसर्जन फक्त म्हणायला रे, बाकी माझ्यासोबत तू असतोसच की कायम दिसत राहतोस...कधी कामात, कधी माणसांमध्ये माझ्यावर अतोनात नि:स्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयु्यात आहेत आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मम्मा म्हणते कसं "जाते नाही येते म्हणावं गं". मग आता..ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने..तुला सगळ्यासाठी खूप थँक्यू आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहिती आहे आपलं..) सुखी राहा..आनंदात राहा...तुला खूप प्रेम...भेटूच". 

श्रेया बुगडे आणि बाप्पाचं खूप खास नातं आहे. गणेशोत्सव हा अभिनेत्रीचा आवडता सण आहे. श्रेयाच्या पोस्टवर खूप छान लिहिलं आहे, गणपती बाप्पा मोरया, किती सुंदर, अप्रतिम लिहिलं आहेस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. श्रेया बुगडेच्या घरी पाच दिवसांचा बाप्पा असतो. त्यामुळे आता ती बाप्पाच्या आठवणीत रमली आहे. 

संबंधित बातम्या

Prathamesh Parab : बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी; प्रथमेश परबचं बाप्पाकडे मागणं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, 'या' 9 सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार?
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर

व्हिडीओ

Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, 'या' 9 सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार?
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; हातातील बंद घड्याळाची वाईट वेळही दिली
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर
मोठी बातमी! निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर
Mangal prabhat Lodha BMC Mumbai: मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
मंगलप्रभात लोढांचं मुंबई महानगरपालिकेतील 'ते' कार्यालय अखेर बंद होणार, नेमकं काय घडलं?
Satara Election : राष्ट्रवादी शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले, सेना ठरणार किंगमेकर
साताऱ्यात भाजपला अंतर्गत राजकारण नडले, सेना ठरणार किंगमेकर, राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी 
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
Embed widget