वसई : वसई तालुक्यात शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. S.P. कॉलेज, वाडा येथे प्रवेश घेतलेल्या अरबाज अस्लम कुरेशी याने स्वतःच्या ऐवजी अहमद रजा फयाजउद्दीन खान याला परीक्षेला बसवले. ओमसाई इंग्लिश हायस्कूल, तुंगारेश्वर येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. मात्र, ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीचा पाठलाग करून परीक्षा केंद्रावरच त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेमुळे वसई तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेतील मोठ्या गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, अरबाज कुरेशी याची काही राजकीय नेत्यांशी जवळीक होती. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील पोस्ट केले होते. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अशा गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान
राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेला (Exam) 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची (Copy) प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे. काही टिकाणी थेट विद्युत रोहित्राजवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI