मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई

सध्या महानगरांचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक ठिकाणी महापालिका किंवा संबंधित सरकारी यंत्रणांकडून पाडकाम व अतिक्रमण हटाव मोहीम आखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे आपलं बस्तान बसवून, व्यवसाय सुरू करुन राजकीय आश्रय घेऊन अनेकजण जागेवर कब्जा मिळवतात. त्यामुळे, वाहतूक कोंडी होऊन नागरिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

कांदिवली (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या 30 दुकानांवर आता महापालिकेकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
कांदिवली (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गाच्या (एस.व्ही. रोड) रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 30 दुकानांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभागाच्या वतीने आज अतिक्रमण हटाव निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
उप आयुक्त (परिमंडळ-7) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त मनीष साळवे यांच्या नेतृत्वात ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी, मोठा फौजफाटा त्यांच्या सोबतीला होता.
स्वामी विवेकानंद मार्गाच्या (एस. व्ही. रोड) रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकाम धारकांची पात्रता निश्चित करुन स्वामी विवेकानंद मार्ग, पोईसर मशीदजवळील 30 दुकाने/गाळ्यांवर ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, परिणामी, स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडी सुटून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. या कारवाईसाठी 50 मनुष्यबळासह 2 जेसीबी आणि 2 डंपर तैनात करण्यात आले होते. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.