(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'धोनी: दी अनटोल्ड स्टोरी'ची पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
नवी दिल्लीः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक 'धोनी: दी अनटोल्ड स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची कमाई करत या वर्षातील अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
https://twitter.com/taran_adarsh/status/782099588622585856एवढी मोठी ओपनिंग मिळवणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे. या वर्षात केवळ 'सुलतान' सिनेमाने मोठी ओपनिंग मिळवली आहे, त्यानंतर 'धोनी: दी अनटोल्ड स्टोरी'ने बाजी मारली आहे. पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा आतापर्यंतचा पहिलाच बायोपिक आहे, अशी माहिती समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/782098982826676224कसल्याही सुट्ट्या नसताना एवढी कमाई करण्याचा अनोखा विक्रम या सिनेमाच्या नावावर झाला आहे. सिनेमाला चेन्नईमध्ये जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. हा सिनेमा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. त्याचा देखील फायदा झाल्याचं दिसत आहे. देशभरात जवळपास 3 हजार स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.