Dhanush And Aishwaryaa Divorce : धनुष आणि ऐश्वर्याचे पॅचअप? अभिनेत्याचे वडील म्हणतात..
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धनुष आणि ऐश्वर्या यांच्या पॅचअपबाबत धनुषचे वडील कस्तूरी राजा यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्वाला कस्तूरी राजा यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
![Dhanush And Aishwaryaa Divorce : धनुष आणि ऐश्वर्याचे पॅचअप? अभिनेत्याचे वडील म्हणतात.. dhanush father kasturi raja say about dhanush and Aishwaryaa rajinikanth patch up Dhanush And Aishwaryaa Divorce : धनुष आणि ऐश्वर्याचे पॅचअप? अभिनेत्याचे वडील म्हणतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/b1ae6d2f11fa030adcce5dab49a0faf81665468562492259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhanush: साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth) या दोघांनी आपला 18 वर्षाचा संसार मोडून एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, हे दोघे पॅचअप करणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धनुष आणि ऐश्वर्या यांच्या पॅचअपबाबत धनुषचे वडील कस्तूरी राजा यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्वाला कस्तूरी राजा यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाले धनुषचे वडील?
मुलाखतीदरम्यान कस्तुरी यांना त्यांचा मुलगा धनुष आणि ऐश्वर्या यांच्या पॅचअपबद्दल विचारण्यात आले. कस्तुरी राजा यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळलं, त्यांनी असेही सांगितले की त्यांना आणि त्यांच्या पत्नीला वाटतं की मुलं आनंदी राहवीत. त्यांच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.
सोशल मीडियावर शेअर केली होती पोस्ट
धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,"मित्र, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहण्याचा हा प्रवास समजूतदारपणाचा, जुळवून घेण्याचा होता. पण आज आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा".
असं झालं होतं लग्न
अफेअरच्या अफवेमुळे धनुष आणि ऐश्वर्या दोघेही हैराण झाले होते. त्यावेळी धनुष 21 वर्षांचा तर ऐश्वर्या 23 वर्षांची होती. मग या दोघांनीही लग्न करावं असं दोघांच्या घरच्यांनी मागणी केली. त्यानंतर अगदी घाईगडबडीत, 18 नोव्हेंबर 2004 रोजी या दोघांचे लग्न पार पडलं. हे लग्न रजनीकांत यांच्या घरी झालं. या दोघांना दोन मुलं असून राजा आणि लिंगाराजा असं त्यांची नावं आहेत. आता या दोघांनी 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
धनुषचे चित्रपट
अभिनेता असण्यासोबतच धनुष हा निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे. त्यानं 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. धनुषनं दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा अतरंगी रे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. धनुषच्या द ग्रे-मॅन या हॉलिवूड चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)