Sunetra Pawar NCP President : आव्हानांचे डोंगर सुनेत्राताई कशा पेलणार? Special Report
एकीकडे अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार सातत्यानं प्रश्न विचारत असताना... राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपासून नवं पर्व सुरू झालं... सुनेत्रा पवार आता ऑफिशियली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात... मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाली... आता चर्चा सुरू झालीये ती सुनेत्राताईंसमोर असलेल्या आव्हानांची... बघुयात राष्ट्रवादीच्या या विशेष बैठकीचा हा स्पेशल रिपोर्ट...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनेत्रा पवार पर्व सुरू झालंय...
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर पक्षात निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्याची जबाबदारी...
४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांच्या सावलीसारख्या राहिलेल्या सुनेत्रा पवारांवर असेल...
गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची एकमतानं निवड झाली...
अजितदादा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचं सत्तेमधलं जे स्थान होतं ते स्थान अबाधित ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान असेल...
फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलं असताना पक्षाचे शिलेदार त्यांना स्वतःसोबत ठेवावे लागतील...
पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीची राजकीय कारकीर्द प्रस्थापित करण्याची जबाबादारी आता त्यांना पार पाडावी लागेल...
दिल्लीश्वरांशी समन्वय साधून आपली पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर कायम राहील, हेदेखील त्यांना बघावं लागेल...
All Shows


































