Rinku Singh Father Dies : सिलिंडर उचलून मुलाला स्टार बनवणाऱ्या बापाने अखेरचा श्वास घेतला, रिंकूचं पितृछत्र हरपलं, रिंकू सिंहच्या वडिलांना कोणता आजार झाला होता?
Rinku Singh Father Dies Marathi News : भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Rinku Singh Father Passes Away News : भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील खानचंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते स्टेज-4 यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होते. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
After battling fourth-stage cancer, Cricketer Rinku Singh’s father breathed his last at Yatharth Hospital-Omega -1, Greater Noida (Uttar Pradesh) today at 5 am: Yatharth Hospital PRO
— ANI (@ANI) February 27, 2026
(File photo) pic.twitter.com/bqjSaz24wq
सिलिंडर उचलून मुलाला स्टार बनवणाऱ्या बापाने अखेरचा श्वास घेतला
रिंकू सिंहला आज जग ओळखते, पण त्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी रक्ताचं पाणी केलं होतं. अलिगडमध्ये घरोघरी जाऊन गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे काम खानचंद्र सिंह करायचे. अत्यंत गरिबीतही त्यांनी मुलाच्या स्वप्नांना कधी तडा जाऊ दिला नाही. रिंकू जेव्हा मैदानात षटकार खेचायचा, तेव्हा त्याचे वडील आजही अलिगडच्या गल्लीत सिलेंडरची डिलिव्हरी करताना दिसायचे. मुलाने करोडो रुपये कमावले, तरीही कष्टाची साथ न सोडणाऱ्या पित्याचा हा प्रवास आता थांबला आहे.
यशस्वी क्रिकेटपटू झाल्यानंतर रिंकूने वडिलांना मेहनतीचे काम सोडायला लावले. अलीकडेच त्याने वडिलांना महागडी स्पोर्ट्स बाईक भेट दिली होती. बाप-लेकांमधील नातं अतूट आणि भावनिक होतं. त्यामुळे वडिलांच्या निधनाने रिंकू पूर्णपणे तुटला आहे.
रिंकू सिंगच्या वडिलांची कर्करोगाशी झुंज अपयशी
खानचंद्र सिंह यांच्यावर काही काळापासून रिनल रिप्लेसमेंट थेरपीही सुरू होती. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी आहे आणि रिंकूही संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मंगळवारी चेन्नईतील सराव सत्रात तो अनुपस्थित होता. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे कळताच रिंकूने टीम इंडियाचा तात्पुरता निरोप घेत घरी धाव घेतली. 24 फेब्रुवारी रोजी तो चेन्नईहून प्रथम दिल्लीला आणि त्यानंतर ग्रेटर नोएडा येथे रुग्णालयात दाखल असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी पोहोचला होता. भारतीय संघाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनीही पत्रकार परिषदेत रिंकूच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती आणि परिस्थिती सुधारल्यानंतर तो संघात परत येईल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेतला.
विश्वचषकातील रिंकूची कामगिरी...
यंदाच्या विश्वचषकात रिंकूने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना वगळता इतर सामने खेळले आहेत. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने त्याला मोठी खेळी करण्याची संधी मर्यादित मिळाली. अमेरिका आणि नामिबियाविरुद्ध तो एक आकडी धावसंख्येत बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध त्याने 4 चेंडूत 11 धावा केल्या, तर नेदरलँड्सविरुद्ध 3 चेंडूत 6 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र तो शून्यावर बाद झाला.
हे ही वाचा -
Rinku Singh Father passes away: मोठी बातमी: भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन





















