Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना की, विजय देवरकोंडा कोणाची कमाई सर्वाधिक? दोघांचं नेटवर्थ किती?
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: सध्या रश्मिका आणि विजय यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. पण, अशातच दुसरीकडे दोन्ही साऊथ सुपरस्टार्सच्या (South Superstar) नेटवर्थच्या चर्चाही रंगल्या आहेत. जाणून घेऊयात, दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण?

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: सध्या देशात एका लग्नाची जोरदार चर्चा रंगलीय, ते लग्न म्हणजे, साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांचं. दोघेही 26 फेब्रुवारी रोजी उदयपूर (Udaipur) इथे लग्नबंधनात अडकणार आहेत. चाहतेही दोघांच्या लग्नसोहळ्याबद्दल खूपच खूश आहेत. दोघांनी आपल्या लग्नासाठी आपल्या नावाचा एक शॉर्टफॉर्मही तयार केलाय, 'विरोश' हॅशटॅगनं दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले जात आहेत. सध्या रश्मिका आणि विजय यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. पण, अशातच दुसरीकडे दोन्ही साऊथ सुपरस्टार्सच्या (South Superstar) नेटवर्थच्या चर्चाही रंगल्या आहेत. जाणून घेऊयात, दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण?
रश्मिका मंदानाची संपत्ती किती? (Rashmika Mandanna Net Worth)
- रश्मिका मंदानाची 2026 मध्ये अंदाजे एकूण संपत्ती 66 कोटी आहे. तिनं ही संपत्ती तिच्या चित्रपटाच्या फी आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे मिळवली आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रत्येक सिनेमासाठी 4 कोटी ते 8 कोटींचं मानधन घेते. 'पुष्पा'सारख्या मोठ्या हिट सिनेमासाठी तिनं अधिकचं मानधन घेतल्याचं सांगितलं जातं.
- तिला एका प्रोजेक्टसाठी 10 कोटीपर्यंत पैसे देण्यात आले आहेत.
- सिनेमांव्यतिरिक्त, रश्मिका ज्वेलरी, ब्युटी, ड्रिंक आणि कंज्युमर ब्रँडसोबत्या पार्टनरशिपमधून मोठी कमाई करते. या यादीमध्ये स्वारोवस्की, बोट, कल्याण ज्वेलर्स, 7UP आणि मीशो यांचा समावेश आहे.
ती व्हेगन ब्युटी ब्रँड प्लममध्ये देखील एंबेसडर आणि इन्वेस्टर आहे. - रश्मिकाच्या रियल इस्टेट पोर्टफोलियोमध्ये बंगळुरू, मुंबई, गोवा, हैदराबाद आणि कूर्गमधल्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. ज्यामध्ये तिच्या बंगळुरू वाल्या घराची किंमत जवळपास 8 कोटी रुपये आहे.
- याव्यतिरिक्त तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये ऑडी Q3, रेंज रोवर स्पोर्ट, मर्सिडीज-बेंज C-क्लास यांसारख्या कार्सचा समावेश आहे.
विजय देवरकोंडाचं नेटवर्थ किती? (Vijay Deverakonda Net Worth)
- साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाचा होणारा नवरा साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाबाबत बोलायचं झालं तर, तो टॉलिवूडच्या मोस्ट पॉप्युलर अभिनेत्यापैकी एक आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, विजयचं 2026 पर्यंतचं अंदाजे नेटवर्थ 66 कोटी ते 70 कोटी रुपयांमध्ये आहे. विजयच्या कमाईचा मुख्य स्त्रोत सिनेमा आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता प्रत्येक प्रोजेक्टसाठी 12 कोटी ते 15 कोटी शुल्क आकारतो.
- तो ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील मोठ्या प्रमाणात कमाई करतो, ज्यामध्ये अनेकदा डील 1 कोटींपेक्षा जास्त असतात.
- विजय सोशल मीडियावरील प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टसाठी अंदाजे 40 लाख शुल्क आकारतो.
- अभिनयाव्यतिरिक्त, विजयच्या आर्थिक गुंतवणुकीत त्याचा कपड्यांचा ब्रँड, राउडी वेअर समाविष्ट आहे, जिथून त्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं.
- हैदराबाद ब्लॅक हॉक्स व्हॉलीबॉल संघातही त्याचा वाटा आहे. त्याची भव्य जीवनशैली त्याच्या हैदराबादमधील घरात दिसून येते, ज्याची किंमत अंदाजे 15 कोटी आहे.
- विजय देवरकोंडाकडे BMW 5 सीरीज़, फोर्ड मस्टँग, वोल्वो XC90, मर्सिडीज-बेंज GLS आणि रेंज रोवर या लक्झरी कार्स आहेत.
- काही रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याकडे जवळपास 30 कोटींचं एक प्रायव्हेट जेटही आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचं एकत्रित नेटवर्थ किती?
या दोघांनीही चित्रपट, एंडोर्समेंट आणि बिज़नेस वेंचर्समध्ये मजबूत करिअर घडवलं आहे. दोन्ही स्टार्सनी रिअल इस्टेटमध्ये धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. गुड रिटर्न्सनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची अंदाजे एकत्रित निव्वळ संपत्ती 130 कोटी ते 136 कोटींच्या दरम्यान आहे. रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
रश्मिका विजयची लगीनघाई, पंतप्रधानांनी दिल्या पत्र लिहित खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल
























