एक्स्प्लोर

Dhananjay Munde on Rohit Pawar: सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या दिवशीच बारामतीत एफआयआरसाठी स्टंट; धनंजय मुंडेंनी डागली रोहित पवारांवर तोफ

Dhananjay Munde on Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता कडाडून टीका केली आहे.

Dhananjay Munde on Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर नाव न घेता कडाडून टीका केली आहे. दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.  

मुंबईतील वरळी डोम येथील सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य व देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली.

Dhananjay Munde: महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही? 

धनंजय मुंडे म्हणाले की, दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी निर्णय घेतला की, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे. माझी मध्यंतरी वाचा गेली होती. तशीच गेली असती तर बरे झाले असते, असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कारण आपल्या मुखातून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आली नसती. महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुनेत्रा ताई व्यवस्थित सांभाळातील, असा आम्हाला विश्वास आहे. वहिणींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. अजित दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही? असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.  

Dhananjay Munde on Rohit Pawar: माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आज सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणार हे आम्ही आधीच जाहीर केले होते. काल एफआयआर घेतला नाही म्हणून स्टंट केला. आज बारामतीला एफआयआरसाठी स्टंट केला. हे सगळे आमच्या न्यूज किलिंगसाठी केले जात आहे. माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर टीका केली.   

आणखी वाचा 

Rohit Pawar : पार्थ पवार तुमच्यासोबत का नाहीत? त्यांच्यावर दबाव आहे का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, सगळेच लढत...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Embed widget