एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका
बँकांमध्ये 31 तारखेपर्यंत केवळ कर्जाचा हप्ता भरणे आणि कर्ज मंजूर करणे या दोनच बाबींवरती काम होणार आहे. इतर कोणतेही काम 31 तारखेपर्यंत बँकांनी करू नये असे स्पष्ट निर्देश परिपत्रकामधून देण्यात आले आहे.
बीड : कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. या चक्रातून शेतकरी देखील सुटलेला नाही. बीड जिल्ह्यातील बँकांमध्ये 31 तारखेपर्यंत केवळ कर्जाचा हप्ता भरणे आणि कर्ज मंजूर करणे या दोनच बाबींवरती काम होणार आहे. इतर कोणतेही काम 31 तारखेपर्यंत बँकांनी करू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सगळे आधार सेंटर 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणखी झाली नाही अथवा त्यासंदर्भात काही काम बाकी असले तर ते काम 31 तारखेनंतर होईल असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे कोरोनाचा फटका आता शेतकरी कर्जमाफीला देखील बसणार असल्याची चिन्हे आहेत.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एक नियमावली तयार केली आहे. यापूर्वीच बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्या अंतर्गत आज एक नियमावलीचा परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. यात कोरोना संदर्भात प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबीची जबाबदारी ठरवून दिलीय.
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील बँकांमध्ये 31 तारखेपर्यंत केवळ कर्जाचा हप्ता भरणे आणि कर्ज मंजूर करणे या दोनच बाबींवरती काम होणार आहे. इतर कोणतेही काम 31 तारखेपर्यंत बँकांनी करू नये असे स्पष्ट निर्देश राहुल रेखावार यांनी काढलेल्या परिपत्रकामधून देण्यात आले आहे.
यासोबतच जिल्ह्यातील सगळ्या एटीएमची स्वच्छता ही दर तासाला करणे बंधनकारक राहील अशाही सूचना देण्यात आले आहेत विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सगळे आधार सेंटर 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणखी झाली नाही अथवा त्यासंदर्भात काही काम बाकी असले तर ते काम 31 तारखेनंतर होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे
बीड जिल्ह्यातील आठवडे बाजार 31 तारखेपर्यंत बंद असणार आहेत. जिल्ह्यातील सगळ्या बँकांमध्ये केवळ कर्ज काढणे आणि कर्जाचा हप्ता भरणे व्यतिरिक्त कोणतेही कामकाज होणार नाही. या प्रत्येक क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडे यादरम्यान लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी घालून दिलेल्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असेही या पत्रकामध्ये म्हटले आहे.
#Corona Precautions | कोरोना संशयितावर घरातच उपाय शक्य, कोरोना कसा टाळाल? स्पेशल रिपोर्ट
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement