एक्स्प्लोर

Girish Oak On Sachin Pilgaonkar: 'ही चेहरा नसलेली माणसं...'; मराठी अभिनेते गिरिश ओक सचिन पिळगावकरांबाबत नेमकं काय म्हणाले?

Girish Oak On Sachin Pilgaonkar: कमेंट करणं, ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. ही चेहरा नसलेली माणसं आहेत. त्यांना काही काम नाही म्हणून ते रिअॅक्ट करतात, असं गिरिश ओक म्हणाले.

Girish Oak On Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजनविश्वात (Marathi Industry) 'महागुरू' म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgounkar) त्यांच्या काही आठवणी मुलाखतींमध्ये सांगत असतात. अगदी बालवयातच त्यांनी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक, डान्सर म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर यांनी हिंदी, मराठीतील अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली. त्यांनी 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. अनेकदा मुलाखतींमध्ये ते आपले अनुभव शेअर करताना दिसतात. त्यावरुन त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशातच आता सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं वक्तव्य केलं आहे. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीश ओक (Girish Oak) यांनी कलाकारांच्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल बोलताना सचिन पिळगावकर (Actor Sachin Pilgaonkar) यांना ट्रोल करणाऱ्यांना झाप झाप झापलंही आहे.  

मराठी अभिनेते गिरिश ओक सचिन पिळगावकरांबाबत म्हणाले की, "कमेंट करणं, ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. ही चेहरा नसलेली माणसं आहेत. त्यांना काही काम नाही म्हणून ते रिअॅक्ट करतात. वाईट कमेंट करणाऱ्या लोकांमुळे एखादा माणूस खूप डिस्टर्बही होऊ शकतो. दोनशे वाईट आणि एखादी चांगली कमेंट असते..."

पुढे बोलताना गिरीश ओक म्हणाले की, "आता ज्याप्रकारे सचिन पिळगावकरांबद्दल जे ट्रोलिंग सुरू आहे... काय आहे ते... तो माणूस वयाच्या सातव्या वर्षापासून काम करतोय. त्याच्या आयुष्यात असे अनुभव आलेले असणारच. त्याला तुम्ही काय बोलताय... त्याची खरंच ओळख होती... मीना कुमारीशी, संजीव कुमारशी होती. सगळ्यांशी त्याची ओळख होती. असे अनुभवही आहेत. पण तुम्ही चेष्टाच करायची ठरवली आहे तर वाटेल ते बोलायला लागले आहेत..."

"त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही ट्रोलिंग करायला लागता. तुम्हाला एक नागरिक म्हणून काहीच वाटत नाही का? असं कोणी कसं काय करू शकतो? पण या ट्रोल करणाऱ्या लोकांना कळत नाही की खरंच एखादी व्यक्ती जर भावनिक असेल तर काय होऊ शकतं...यांच्या ट्रोलिंगमुळे काहीतरी विचित्रही घडू शकतं", पुढे बोलताना असं गिरीश ओक म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nilesh Sable Social Media Post: 'नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…'; निलेश साबळेच्या पोस्टची जोरदार चर्चा, डॉक्टरांची नवी सुरुवात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट
प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
Embed widget