एक्स्प्लोर

बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार

12th Std Paper Leak: नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मुलीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते.

12th Std Paper Leak: बारावी पेपरफुटीमध्ये नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत.18 फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतरही, आरोपींनी 21 फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिला आहे. शिक्षण मंडळ पोलिसांशी समन्वय साधून असल्याचे डॉ शिवलिंग पटवे यांनी सांगितले. सध्या या प्रकरणात चार आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मुलीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते. या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून, एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद अटकेत आहे. 

आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला 

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता, पोलिसांनी  तो डेटा रिकव्हर केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 18 तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर  गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही 21 फेब्रुवारीला गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले. गणिताचा सुद्धा पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दुसरीकडे, पाच सदस्यीय विशेष तपास पथककडून पेपर फुटी संदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. रसायन, भौतिकसोबत गणिताचाही पेपर फुटल्याने पेपरफुटीचे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचा संशय

दुसरीकडे, 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या बारावीच्या रसायनशास्त्राच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचा संशय आला होता. हा पेपर नागपूरमधील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने वारंवार शौचालयात जाण्याने संशयास्पद गैरव्यवहार उघडकीस आला होता. मोबाईल फोन वापरून फसवणूक करताना पकडण्यात आले, जे नंतर जप्त करण्यात आले. विश्लेषणानंतर, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. त्याच ग्रुपमध्ये संभाव्य उत्तरे देखील देण्यात आली होती.

प्राथमिक तपासात एका खाजगी कोचिंग संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीने पैशाच्या बदल्यात प्रश्नपत्रिका शेअर केल्याचा आरोप आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी रोजी सुरू झाल्या असून 11 मार्च रोजी संपतील. 3387 केंद्रांवर 13 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Nagpur HSC Paper Leak Case : नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget