एक्स्प्लोर

HSC paper leak: बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

HSC paper leak: रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

HSC paper leak: नागपूरमध्ये बारावी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे समोर आल्याने हे प्रकरण केवळ अपघाती नसून संघटित रॅकेट असल्याचा संशय बळावला आहे.

HSC paper leak: गुन्हा दाखल झाल्यानंतरही गणिताचा पेपर लीक

16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 तारखेला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी आपले मोबाईल फॉरमॅट केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांनी डिलिट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर केला असता 21 फेब्रुवारीला गणिताचा तिसरा पेपरही प्रसारित झाल्याचे डिजिटल पुरावे समोर आले. विशेष म्हणजे, सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर प्रसारित झाल्याचे आधीच उघड झाले होते. आता गणिताचा पेपरही त्याच साखळीतून बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

HSC paper leak: मुख्य सूत्रधार फरार

या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून याला अटक करण्यात आली आहे. तसेच एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला पाचवा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक कार्यरत आहे.

HSC paper leak: सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही परीक्षा केंद्रांवर विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात पोहोचल्याची तक्रार पर्यवेक्षकांनी केली आहे. 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका मिळाल्याचे निदर्शनास आले. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजीच्या पेपरसंदर्भात ही बाब घडल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रेसमधून सीलबंद पाकिटे थेट परीक्षा केंद्रांवर पाठवली जात असताना लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका कशा गायब झाल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांमार्फत बोर्ड अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून, बोर्डाने तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

HSC paper leak: दोन्ही घटनांमध्ये संबंध?

पेपरफुटी प्रकरणात चार जणांना अटक झाली असून काही महाविद्यालयांशी टायअप असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा प्रकार आणि डिजिटल माध्यमातून पेपर प्रसारित होण्याच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. रसायन, भौतिकशास्त्र आणि गणित या तिन्ही विषयांचे पेपर फुटल्याने बारावी परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य सूत्रधार सापडल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.

आणखी वाचा 

Ritu Tawde Rolex Watch: रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण म्हणाल्या, 'ते घड्याळ...'

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Nagpur HSC Paper Leak Case : नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget