बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तनुश्रीविरोधात ही गुन्हा दाखल केली आहे.

बीड : अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तनुश्रीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन केज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तनुश्रीनं राज ठाकरे आणि मनसेविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, असा आरोप धस यांनी केला आहे. तनुश्रीच्या आरोपांमुळे राज ठाकरे आणि पक्षाचं अब्रू नुकसान होत आहे, त्यामुळे ही तक्रार दाखल करत असल्याचं धस यांचं म्हणणं आहे.
बीड, उस्मानाबाद, लातूरसह संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्ते तनुश्री दत्ताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. त्यामुळे येत्या काळात तनुश्री विरोधातील पोलीस तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मनसे आणि राज ठाकरेंवर आरोप
अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्रीने केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असं ती म्हणाली होती.
''नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो,'' असा आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला होता. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता.
काय आहे प्रकरण?
'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला होता.
तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री सांगते.
काय म्हणाली तनुश्री दत्ता?महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
