एक्स्प्लोर

जबरदस्त डायलॉग्स अन् अॅक्शन; 'छत्रपती' चा टीझर पाहिलात का?

अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवासच्या (Bellamkonda Sreenivas) छत्रपती (Chatrapathi) या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Chatrapathi official teaser out: अभिनेता प्रभासचा (Prabhas) छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट 2005 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. या रिमेकमध्ये अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव देखील छत्रपती हेच असणार आहे. छत्रपती या चित्रपटाच्या माध्यमातून बेल्लमकोंडा श्रीनिवास हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच छत्रपती चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरच्या सुरुवतीला 'अपने लिए तो हर कोई जीता है, लेकिन जो औरों के लिए जीता है उसे छत्रपती कहते है' असा डायलॉग ऐकू येतो. टीझरमध्ये बेल्लमकोंडा श्रीनिवासचा डॅशिंग अंदाज बघायला मिळत आहे. 

छत्रपती चित्रपटाची स्टार कास्ट

छत्रपती या चित्रपटात  बेल्लमकोंडा श्रीनिवासच्यासोबतच नुसरत भरुचा, साहिल वैद, अमित नायर, राजेंद्र गुप्ता, शिवम पाटील, स्वप्नील, आशिष सिंग, मोहम्मद मोनाजीर, आरोशिका डे, वेदिका, जेसन हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

पाहा टीझर 

View this post on Instagram
 
A post shared by Pen Movies (@penmovies)

कधी रिलीज होणार छत्रपती चित्रपट?

12  मे 2023 रोजी छत्रपती चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन व्ही.व्ही.विनायक करत आहेत. जयंतीलाल गडा यांचे पेन स्टुडिओज या चित्रपटाचे निर्मिते आहेत. छत्रपती या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली असून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. तनिष्क बागची या चित्रपटाचे संगीतकार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas)  हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. बेल्लमकोंडा श्रीनिवासनं अल्लुदु अधुर्स, सीता, या तेलुगू चित्रपटामध्ये काम केलं. आता त्याच्या छत्रपती या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Chatrapathi Poster: 'छत्रपती' चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget