Gulzar : शब्दांचा जादूगार... गीतकार गुलजार यांचं खरं नाव माहितीये?
प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक गुलजार (Gulzar) यांचा आज 88 वा वाढदिवस आहे.
Gulzar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक गुलजार (Gulzar) यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. गुलजार यांचं खरं नाव संपूर्णसिंह कालरा आहे. (Sampooran Singh Kalra) असं आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर गुलजार यांनी त्यांचे नाव बदललं. गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 मध्ये पंजाबमधील झेलम जिल्ह्यामध्ये झाला, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंब अमृतसर येथे आले.
गुलजार यांनी दिल्लीमध्ये शिक्षण घेतलं.शिक्षणपूर्ण झाल्यानंतर करिअरसाठी ते मुंबईमध्ये गेले. सुरुवातीला त्यांनी कार मॅकेनिक म्हणून देखील काम केलं. बऱ्याच संघर्षानंतर त्यांनी 1963 मध्ये रिलीज झालेल्या बंदिनी या चित्रपटामधील गाणी लिहिली. त्यानंतर त्यांनी विविध गाणी लिहायला सुरुवात केली. गुलजार यांचे वडील आणि भाऊ हे गुलजार यांच्या लेखनाला विरोध करत होते. गुलजार जेव्हा बालपणी लेखन करत होते, तेव्हा अनेकवेळा त्यांना कुटुंबातील लोक ओरडत होते. त्यामुळे ते त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांकडे जाऊन लिखाणाची प्रॅक्टिस करत होते.
गुलजार यांनी 1973 मध्ये अभिनेत्री राखी यांच्यासोबत लग्न केलं. पण या दोघांचा संसार एक वर्ष देखील टिकला नाही. दोघांनी लग्नानंतर एक वर्षांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण राखी आणि गुलजार यांनी अजून घटस्फोट घेतलेला नाही. दोघांना मेघना नावाची मुलगी आहे.
अनेक पुरस्कारांनी करण्यात आलं सन्मानित
गुलजार यांना 2010 मध्ये 'स्लमडॉग मिलेनियर'मधील 'जय हो' गाण्यासाठी ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. त्यांना 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 22 फिल्मफेअर पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री आणि दादासाहेब फाळके या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ओमकारा, रेनकोट,पिंजर,दिल से,आँधी, दूसरी सीता,इजाजत या चित्रपटांमधील गाण्यांचे गीतकार गुलजार हे आहेत. कजरारे, बिडी जलैले या गुलजार यांनी लिहिलेल्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं.
दिग्दर्शक म्हणून देखील केलं काम
मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, खुशबू, आँधी, मौसम,किनारा, किताब, अंगूर, नमकीन, मीरा, इजाजत, लेकिन, लिबास, माचिस, हु तू तू यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन गुलजार यांनी केलं आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: