एक्स्प्लोर

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

मुंबईत सन 2020 मध्ये वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या आंदोलन प्रकरणी नगरसेवक आकाश पुरोहित यांना आज अटक करण्यात आली आहे.

मुंबई : भाजपचे मुंबई (Mumbai) महापालिकेतील नगरसेवक (Nagpursevak) आकाश पुरोहित यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे. कोर्टाच्या तारखेला न आल्याने सत्र न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. तसेच, आकाश पुरोहित यांचा वॉरंट रद्द करण्याचा अर्ज देखील सत्र न्यायालयाने फेटाळल्याने अखेर आज आकाश पुरोहित यांना अटक करण्यात आली. आता, उद्या 6 जुलै रोजी उच्च न्यायालयात (Court) जामीनासाठी ते अर्ज करणार असल्याची माहिती आहे. सन 2020 मध्ये वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या आंदोलन प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 
 
मुंबईत सन 2020 मध्ये वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या आंदोलन प्रकरणी नगरसेवक आकाश पुरोहित यांना आज अटक करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा तसेच पोलिसांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांच्यासह 20 जणांवर आरोप आहेत. आज तपास अधिकाऱ्याची साक्ष नोंदवले जाणार होती आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र पुरोहित आणि इतर काही आरोपी हजर नसल्याने सुनावणी तहकूब करावी लागली. कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढताच पुरोहित आणि इतरांनी कोर्टासमोर हजर होत अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पुरोहित यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक करण्यात आली. 

न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले

वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे आणि कोर्टाच्या खाली गर्दी असल्यामुळे वेळेत न पोहोचता आल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला. याआधी देखील पुरोहित विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते आणि रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आल्याची नोंद घेत न्यायालयाकडून सुनावण्यात आलं. तसेच, आरोपीकडून विलंब करण्याचे  डावपेच जाणीवर्वक अवलंबल्याचे सांगत आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास भविष्यात तो न्यायालयात हजर राहील, अशी कोणतीही शक्यता दिसून येत नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यानुसार, आज आरोपीला अटक करण्यात आली असून उद्या जामीन ठेवला जाणार असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

Embed widget