Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
काही झाल्या वाद हा मुंबईच्या विद्यमान महापौर रितू तावडेंची पाठ सोडायला तयार नाही.. मग तो वाहनावरचा व्हीआयपी दिवा असो किंवा त्यांनी मरीन ड्राईव्हवर काढलेलं रील असो... ज्या प्रकरणाचा रितू तावडेंशी थेट संबंध नाही अशा प्रकरणातही महापौर रितू तावडे कर्मधर्म संयोगानं अडचणीत सापडतात... मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं काढलेल्या एका टेंडरमुळे पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला? हे टेंडर नेमकं कसलं होतं, महापौरांना ते टेंडर मागे का घ्यावं लागलं? या वादाच्या भोवऱ्यांमागे विरोधकांप्रमाणेच पक्षातील काही हितचिंतकच जास्त कारणीभूत आहेत अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे..त्यामुळे रितू तावडेंसाठी पक्षात आणि पक्षाबाहेर असं दुहेरी आव्हान आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















