एक्स्प्लोर

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम

BMM 2026 बीएमएम अधिवेशन म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नव्हे, तर मराठी अस्मिता, संस्कृती, ज्ञान, नवकल्पना आणि जागतिक मराठी समुदायाला जोडणारा दुवा आहे. 

मुंबई : उत्तर अमेरिकेतील मराठी भाषिकांचा सर्वात मोठा सांस्कृतिक, सामाजिक सोहळा - बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) अधिवेशन 2026 यंदा 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान अमेरिकेतील निसर्गरम्य सिअॅटल येथे दिमाखात रंगणार आहे. सुमारे 2,500 मराठी बांधव, उद्योजक, कलाकार, साहित्यिक, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, BMM मराठी शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर ह्या चार दिवसांच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत. समारंभाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. माधुरी कानिटकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बीएमएम अधिवेशन म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नव्हे, तर मराठी अस्मिता, संस्कृती, ज्ञान, नवकल्पना आणि जागतिक मराठी समुदायाला जोडणारा दुवा आहे. नाट्य, संगीत, कला, साहित्य, लोककला, व्यावसायिक संधी, युवा नेतृत्व, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नेटवर्किंग यांचा बहुआयामी अनुभव येथे एकाच छताखाली मिळावा म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विद्यमान बीएमएम अध्यक्ष प्रसाद पानवळकर आणि अधिवेशनाचे संयोजक मोहित चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली आणि नितीन जोशी, सविता मोरे, सुभग ओक, जयंत भोपटकर, अश्विनी क्षीरसागर, शिल्पा कर्वे, अपूर्व चिंचवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्वयंसेवक सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहेत. तसेच B-Connect Conference साठी आनंद चौथाई, Real Estate Conference साठी संतोष साळवी, Film Festival साठी नरेंद्र कल्याणकर, उत्तररंग आणि रेशीमगाठी साठी मेधा गोडबोले, तर Social Media Marketing साठी गौरव पटवर्धन यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेतला आहे. सिअॅटल डाउनटाउनमधील अत्याधुनिक Convention Center मध्ये होणाऱ्या या अधिवेशनासाठी अपूर्व चिंचवडकर आणि निनाद लाडे यांची टीम गेली दोन वर्षे नियोजन करत आहे.

उत्तर अमेरिकेच्या प्रतिभेचा जल्लोष

स्थानिक कलाकारांच्या सहभागातून साकारला जाणारा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्राची संस्कृती, संगीत, नृत्य आणि खाद्यपरंपरेची झलक सादर करेल. पूर्णपणे उत्तर अमेरिकेत लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती झालेले 'अवघा रंग एकची झाला' हे नाटक आणि अमेरिकेत जन्मलेल्या नव्या पिढीने सादर केलेला 'तीर्थ विठ्ठल' हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नक्कीच प्रेक्षकांच्या खास पसंतीस येईल. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेतील शेकडो कलाकार आणि स्पर्धक विविध दर्जेदार सादरीकरणांसाठी सज्ज आहेत. ह्या कार्यक्रमांचे नेतृत्व पराग सहस्रबुद्धे, संजय राऊत, शैलेन्द्र उपाध्ये आणि शीतल पटवर्धन करत आहेत.

भारतातून येणार कलाविश्वातील दिग्गज

भारतातील नामवंत कलाकारही ह्या सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत. सदाबहार विनोदी नाटक 'ऑल दि बेस्ट', लोकपरंपरेचा भव्य आविष्कार 'द फोक आख्यान', आरती अंकलीकर यांची 'संगीत रस-सुरस' मैफल, तसेच लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा 'नाटकामागचे नाटक' हा रंजक कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

'स्वरमंच' स्पर्धेसाठी डॉ. सलील कुलकर्णी यांची उपस्थिती स्पर्धकांना प्रोत्साहन देईल. संजय उपाध्ये, सुनंदन लेले आणि निलेश ओक यांच्या व्याख्यानांतून उपस्थितांना विचारांची समृद्धी अनुभवायला मिळेल.

या विभागाचे नेतृत्व अश्विनी क्षीरसागर, शिल्पा कर्वे, प्रसन्न गणपुळे आणि आरती लोटलीकर यांच्याकडे आहे.

व्यवसाय, नेटवर्किंग, स्पर्धा आणि नव्या संधी

बीएमएम 2026 हे व्यावसायिकांसाठीही सुवर्णसंधी ठरणार आहे. B-Connect आणि Real Estate Expo उद्योजकांसाठी नव्या गुंतवणुकीचे दालन खुले करेल. तसेच तरुणांसाठी Speed Dating आणि Candlelight Concert हे आधुनिक आणि संवादप्रधान उपक्रम विशेष आकर्षण ठरतील. 'कलास्पंदन' आणि 'कलादालन' च्या निमित्ताने प्रथमच जागतिक कीर्तीचे मराठी चित्रकार प्रमोद कुर्लेकर आणि सुचित्रा भोसले यांच्या कलाविश्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमांचे नेतृत्व कैलास भोईटे, सविता मोरे, विनिता मोहिते, सलोनी नगरकर आणि सानिका जोशी करत आहेत.

जागतिक ब्रँड्सचा विश्वास

यंदाच्या अधिवेशनाला Persistent Systems हे शीर्षक प्रायोजक लाभले असून Shreepati Group, Kotibhaskar Infrastructure & Developer, Veena World, आणि BVG India यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनीही मोलाची साथ दिली आहे. निधी संकलन मोहिमेचे नेतृत्व अमोल अडगांवकर, शिल्पा गोडबोले आणि निलेश जोशी करत आहेत. नव्या प्रायोजकांसाठीही बीएमएम २०२६ हे उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायाशी जोडणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.

द्वैवार्षिक परंपरेचा वारसा जपणारे बीएमएमचे हे बाविसावे अधिवेशन म्हणजे व्यावसायिकांना संधी, कलाकारांना व्यासपीठ आणि मराठीबद्दल प्रेम असणाऱ्यांना एकत्र आणणारा आनंददायी अनुभव असेल.

जपूया संस्कृती, विणूया नाती हे ब्रीदवाक्य मनी धरून पाचू नगरी सिअॅटल आता सज्ज झाली आहे... तुम्हीही तयार आहात ना?

कार्यक्रमांची घोषणा, कलाकारांची भेट, खास पडद्यामागच्या गमती आणि अनेक रोमांचक अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी Instagram, Facebook आणि YouTube वर @BMM2026Seattle फॉलो करा.

 – रश्मी खामकर-साठे (Dallas - USA)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget