Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
एका भोंग्याचा आवाज... आणि दोन तासांसाठी शांत होणारे टीव्ही-मोबाईल... धाराशिव जिल्ह्यात सध्या रोज संध्याकाळी हे चित्र पाहायला मिळतंय. प्रश्न एवढाच... स्क्रीनपासून दोन तास दूर राहिल्यानं मुलं खरंच पुस्तकांकडे वळतील का?... आणि त्यासाठी फक्त मोबाईल बंद करणं पुरेसं आहे का?... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
बरोब्बर संध्याकाळी सातचा भोंगा वाजतो...
टीव्ही बंद...
मोबाईल बाजूला...
आणि विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं...
संपूर्ण गावातले विद्यार्थी अभ्यासाला बसतात
धाराशिव जिल्हा परिषदेनं ७१२ ग्रामपंचायतींमध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश एकच...
विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासासाठी घरात दोन तासांचं वातावरण तयार करणं.
विद्यार्थी आणि शिक्षक या प्रयोगाचं स्वागत करत असले, तरी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न केवळ मोबाईलपुरते मर्यादित नाहीत.
अनेक शाळांमध्ये आजही वर्गखोल्या, शिक्षक आणि मूलभूत सुविधांची कमतरता आहे.
त्यामुळे अभ्यासासाठी वेळ आणि शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा, या दोन्हींची सांगड घालणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
धाराशिवचा हा प्रयोग...फक्त मोबाईल बंद करण्यापुरता नाहीय,
तर मुलांनी एकाग्रतेनं अभ्यास करणं हा मूळ उद्देश आहे.
धाराशिवमधल्या ७१२ गावातला हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचं अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात करायला हरकत नसावी
All Shows































