Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Colours Marathi Maha Episode: प्रेक्षकांच्या मनोरंजनाची रंगत अधिक वाढवण्यासाठी कलर्स मराठीच्या लोकप्रिय मालिकांमध्ये येणार आहेत काही मोठे आणि अनपेक्षित ट्विस्ट.

Colours Marathi Maha Episode: स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा ऑगस्ट महिना कलर्स मराठीच्या (Colours Marathi) प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक खास पर्वणी घेऊन येत आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांमधील भावनिक संघर्ष, नात्यांची गुंतागुंत आणि उत्कंठा वाढवणारे थरारक महानाट्य अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची रंगत अधिक वाढवण्यासाठी कलर्स मराठीच्या लोकप्रिय मालिकांमध्ये येणार आहेत काही मोठे आणि अनपेक्षित ट्विस्ट.
छवी-अनिकेत होणार बेघर?
‘मी जिंकून घेईन सारं’ (Mi Jinkun Ghein Saara) या मालिकेत प्रेक्षकांना एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. शांभवीच्या कारस्थानामुळे छवी आणि अनिकेतच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण झाले आहे. बाई आजींच्या कठोर निर्णयानंतर छवी आणि अनिकेतला कायमचे घर सोडावे लागणार आहे. आपलं घर, आपली माणसं आणि आपलं सुरक्षित जग मागे सोडून आता या दोघांसमोर उभा ठाकला आहे आयुष्याचा मोठा संघर्ष. छवी आणि अनिकेत खरंच बेघर होणार का? या संकटातून ते बाहेर पडू शकतील का? की शांभवीचा डाव त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणार?

मोहिनी-RKच्या सुखी संसाराची सुरुवात की विश्वासघाताची नांदी?
दुसरीकडे, 'मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी'मध्येही (Mohini Colours Marathi Serial) नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. अनेक संघर्ष आणि गैरसमजांना सामोरं गेल्यानंतर अखेर मोहिनी आणि RK विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्यांच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरुवात खरंच सुखी संसाराने होणार आहे का? की या नात्यामागे दडलेला एखादा मोठा विश्वासघात त्यांच्या आनंदावर विरजण घालणार आहे? प्रेमाची ही फिल्मी कहाणी आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली असून, मोहिनी आणि RKच्या नात्यात पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

छवी आणि अनिकेतसमोर उभ्या ठाकलेल्या या संकटाचा शेवट काय होणार? मोहिनी आणि RKच्या आयुष्यात सुखाची नवी सुरुवात होणार की त्यांच्या नात्याची परीक्षा घेणारं नवं वादळ येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि आणखी अनेक थरारक घडामोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहेत. ऑगस्ट महिना ठरणार आहे भावनांचा, संघर्षाचा आणि उत्कंठावर्धक महानाट्याचा ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















