Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
गूंगी गुडिया या दोन शब्दांवरून उठलेलं राजकीय वादळ शमण्याचं नाव घेत नाहीए. सोमवारी धनंजय मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील प्रसंगाचा संदर्भ देत काँग्रेसनं सुनेत्रा पवार या गूंगी गुडिया असल्याची टीका केली आणि राष्ट्रवादीतून संतापाची लाट उसळली. मंगळवारप्रमाणं आजही राज्यातल्या अनेक शहरांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काँग्रेसचा निषेध केला. दुसरीकडं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना घरचा आहेर देत पत्रकार परिषदेत पाळण्याचे एटिकेट्स सांगितले. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर धक्का बसलेला आणि कोशात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रकरणाच्या निमित्तानं राज्यभरात रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. काँग्रेसचा निषेध करण्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीनं गेले दोन दिवस आपली ताकद आणि प्रभाव दाखवून देण्याचाही प्रयत्न केलाय. सुनेत्रा पवारांवर केलेली टीका काँग्रेसची किती अडचण करणार की राष्ट्रवादीसाठी किती संजीवनी ठरणार, हे पुढच्या काही काळात स्पष्ट होईल.दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.



















