Pooja Bhatt: वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्री पूजा भट्टनं सोडली दारु; बिग बॉसच्या घरात म्हणाली...
वयाच्या 44 व्या वर्षी दारूच्या व्यसनावर कशी मात केली? याबद्दल पूजा भट्टनं (Pooja Bhatt) 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' (Bigg Boss OTT Season 2) या शोमध्ये सांगितला आहे.
Pooja Bhatt: 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' (Bigg Boss OTT Season 2) हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करत आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आणि छोट्या पडद्यावरील कलाकरांनी सहभाग घेतला आहे. या शोमध्ये अनेक कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत आहेत. नुकताच पूजा भट्टनं (Pooja Bhatt) एक किस्सा 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' या शोमध्ये सांगितला आहे.
'बिग बॉस OTT 2' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री पूजा भट्टने शोमध्ये सायरस ब्रोचा आणि इतर सह-स्पर्धकांना तिनं वयाच्या 44 व्या वर्षी दारूच्या व्यसनावर कशी मात केली, याबद्दल सांगितलं. पूजा म्हणाली, "मला मद्यपानाचे व्यसन होते आणि ते मी स्वीकारले होते, नंतर हे व्यसन सोडण्याचा निर्णय मी घेतला."
पुढे पूजा म्हणाली, 'समाज हा पुरुषांना एक परवाना देतो.ज्यामुळे पुरुष व्यसनाबद्दल आणि दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याबद्दल उघडपणे बोलू शकतात. मात्र, महिला खुलेआम दारू पित नाहीत आणि त्यामुळे त्या मोकळेपणानं याबद्दल बोलू शकत नाहीत.लोक मला व्यसनी म्हणायचे. पण नंतर मी दारु सोडण्याचा निर्णय घेतल्यावर त्याबद्दल मोकळेपणानं बोलण्याचा निर्णय घेतला.' दिल है के मानता नहीं, सडक, सर, हम दोनों आणि चाहत यांसारख्या चित्रपटांमध्ये पूजानं काम केलं आहे.
View this post on Instagram
बिग बॉस ओटीटीमध्ये 13 स्पर्धकांनी सहभाग घेतली आहे. अविनाश सचदेव, पलक पुरसवानी, बेबिका धुर्वे, जिया शंकर, आलिया सिद्दीकी, फलक नाज, जिया शंकर, आकांक्षा पुरी, जैद हदीद, सायरस ब्रोचा, मनीषा रानी, अभिषेक मल्हान, पुनीत सुपरस्टार आणि पूजा भट्ट यांनी बिग बॉस ओटीटीमध्ये 13 मध्ये सहभाग घेतला आहे. जियो सिनेमा आणि व्ह्यूट सेलेक्टवर प्रेक्षक हा शो पाहू शकतात. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या शोमध्ये कोणते ट्वीस्ट अँड टर्न्स येणार आहेत? हे बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
इतर महत्वाच्या बातम्य