एक्स्प्लोर

Bholaa Box Office Collection: अजय देवगणच्या 'भोला'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

अजय देवगणच्या (Ajay Devgn) भोला (Bholaa) हा चित्रपट काल (30 मार्च) रिलीज झाला.पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात भोला चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

Bholaa Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या  अजय देवगण (Ajay Devgn) हा आयकॉनिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. भोला हा चित्रपट काल (30 मार्च) रिलीज झाला. भोला या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात भोला चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

भोला या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 11.50 कोटी एवढी कमाई केली आहे. अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे भोला या चित्रपटानं दृष्यम-2 या चित्रपटाचं ओपनिंग-डेचं रेकॉर्ड तोडू शकला नाही. पण वीकेंडला भोला चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.  

भोला चित्रपटाची स्टार कास्ट

भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच  तब्बू,  दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराजने केलं होतं. भारतात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. आता भोला हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अजयच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. शाहरुखच्या 'पठाण'नंतर आता बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'भोला'चा बोलबाला पाहायला मिळू शकतो, असंही म्हटलं जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

कलाकारांचे मानधन

'भोला' या चित्रपटात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.  अजयनं भोला या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. या चित्रपटासाठी त्याने 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच  बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून या सिनेमासाठी तिने चार कोटी मानधन घेतलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन? आकडा वाचून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Embed widget