Saibal Bhattacharya : बंगाली अभिनेता सैबल भट्टाचार्यने केला आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात दाखल
Saibal Bhattacharya : बंगाली अभिनेता सैबल भट्टाचार्यने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Bengali Actor Saibal Bhattacharya Attempts Suicide : लोकप्रिय बंगाली अभिनेता सैबल भट्टाचार्य (Saibal Bhattacharya) यांनी राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एका धारदार शस्त्रानं स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी रात्री सैबल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यांना चितरंजन या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते डीप्रेशनचा सामना करत होते.
West Bengal | Actor Saibal Bhattacharya injured himself in his head and right leg yesterday due to depression under the severe influence of alcohol. He is presently admitted to Chittaranjan Hospital: Kolkata Police
— ANI (@ANI) August 9, 2022
सैबल यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाली आहे.त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ते पत्नी आणि सासरच्या मंडळींना दोष देताना दिसत आहे. ज्या क्षणी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते.
'अमर दुर्गा', 'कोरी खेला', 'उरोन टुब्री' आणि 'मिठाई' अशा लोकप्रिय बंगाली मालिकांमध्ये काम करूनही त्यांना चांगले काम मिळत नसल्याने ते डीप्रेशनमध्ये आले, असे म्हटले जात आहे. अभिनयासोबत ते पटकथा आणि संवादलेखकदेखील होते.
View this post on Instagram
अलीकडेच बंगाली अभिनेत्री पल्लवी डे, बिधीशा डे मजुमदार आणि मंजुषा नियोगी यांनी आत्महत्या केली होती. अशातच आता सैबल भट्टाचार्य यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हवं काम मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. सतत आत्महत्येच्या बातम्या येत असल्याने बंगाली सिनेसृष्टी हादरली आहे.
संबंधित बातम्या