Aryan Khan Video Call : Shah Rukh आणि Gauriला बघताच आर्यनला अश्रू अनावर
Aryan Khan Drugs Case : क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानने 15 ऑक्टोबरला आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान यांच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.
Aryan Khan Video Call With Shahrukh Khan And Gauri Khan : आर्यन खान (Aryan Khan) सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे आर्थर रोडवरील तुरुंगात अटकेत आहे. 15 ऑक्टोबरला आर्यनने आई-वडिलांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आर्यन खानला भेटण्यासाठी गौरी आणि शाहरुखने तुरुंगात न जाता व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्यासोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला.
पोलिस अधिकाऱ्याने शाहरुख आणि गौरीची आर्यनसोबत व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे करुन दिले. या संदर्भात माहिती देताना अधिकारी म्हणाले, आर्यन जवळजवळ 10 मिनिटे त्याच्या पालकांसोबत बोलला. मागील वर्षी कोरोना काळतच तुरुंगात व्हिडीओ कॉलची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबासोबत संपर्क साधता येतो.
व्हिडीओ कॉलवर कळले आर्यनचे दु:ख
आर्यन खानला 20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोडवरील तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यानंतरच आर्यन खानची सुटका होणार की नाही ते कळणार नाही. नुकताच आर्यन त्याच्या आई-वडिलांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना भावुक होत रडला. आर्यनला त्या अवस्थेत बघून शाहरुख आणि गौरीलादेखील अश्रू अनावर झाले.
व्हिडीओ कॉलवर तिघेही रडताना दिसून आले होते. आर्यन खानच्या अटकेमुळे त्याच्या कुटुंबावर वाईट परिस्थिती आली आहे. पोटच्या मुलाचे हाल होत आहेत त्यामुळे त्या दोघांची झोप उडाली आहे. 14 ऑक्टोबरला आर्यनला जामीन मिळेल आणि तो मन्नतवर येईल असे गौरीला वाटले होते. पण तसे काहीच घडले नाही. त्यामुळे 20 ऑक्टोबरनंतर आर्यनची सुटका होईल अशी आशा आहे.
आर्यनच्या कुटुंबाने पाठवले 4500 रूपये
आर्यनला त्याचा कुंटुंबाने मनी ऑर्डरने 4500 रूपये पाठवले आहेत. 11 ऑक्टोबरला आर्यनसाठी कुटुंबाने हे पैसे पाठवले असून तुरूंगाच्या नियमानुसार कोणत्याही कैद्याला दर महिन्याला 4500 रूपयेच मनी ऑर्डरद्वारे पाठवता येतात. या मनी ऑर्डरचा वापर जेलच्या कॅंटीनमधझील विविध वस्तूंच्या खरेदीसाठी करता येतो. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान मनीऑर्डरमधून आलेल्या 4500 रुपयांचा वापर बिस्किटे आणि पाण्याची बॉटल घेण्यासाठी करत आहे.