(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Bacchan: फ्लॉप चित्रपटांनी वैतागून अभिषेक बच्चननं घेतला होता बॉलिवूड सोडायचा निर्णय, पण बीगबींना दिला 'हा' सल्ला
abhishek bacchan: अभिषेक बच्चननं बॉलिवूडमध्ये मोठा खडतर प्रवास केलाय.करिरच्या सुरुवातीलाच अनेक चित्रपट फलॉप ठरले. पण..
Abhishek Bacchan: अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे त्याच्या नुकत्याच रिलिज झालेल्या आय वॉन्ट टू टॉकच्या यशामुळं. अनेक वेबसिरिज, चित्रपटांमधून आपल्यातल्या दर्जेदार अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडवत खिळवून ठेवणाऱ्या अभिषेकनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बातचीत केली आहे.त्यावेळी बीग बींनी अभिषेकला वडील म्हणून नाही तर इंडस्ट्रीतील एक सिनियर म्हणून दिलेला आधार मोठा असल्याचं अभिषेकनं सांगितलं.Galatta plus ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिषेकनं त्याच्या अभिनयक्षेत्रातील आव्हानांविषयी सांगितलं.
अभिषेक बच्चननं बॉलिवूडमध्ये मोठा खडतर प्रवास केलाय.करिरच्या सुरुवातीलाच अनेक चित्रपट फलॉप ठरले, समिक्षकांची छाननी या सगळ्याचा परिणाम माझ्यावर होत असल्याचं अभिषेक सांगतो. बॉक्स आफिसवर सलग काही चित्रपट कामगिरी करू न शकल्यानं अभिनय क्षमतेबद्दलची शंका निर्माण झाली होती. मी काहीही केलं तरी ते काम चालत नसल्याचं मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. मी सर्व प्रकारचे सिनेमे, शैली करून पाहिली. आता मी हे करू शकत नाही. असं अभिषेकनं बीगबींना सांगितलं होतं. पण त्यावळी अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचा आत्मविश्वास वाढवत केवळ वडील म्हणून नाही तर इंडस्ट्रीतला एक जेष्ठ अभिनेता म्हणून पाठिंबा देत प्रोत्साहन दिल्याचं अभिषेक सांगतो.
काय म्हणाले बीग बी?
अभिषेकचा आत्मविश्वास खचल्यानंतर बीग बी म्हणाले होते,"मी हे तुला तुझे वडील म्हणून नाही तर तुझा ज्येष्ठ म्हणून सांगत आहे. तू तयार कलाकृतीच्या जवळपासही नाहीस. तुला खूप सुधारणा करायच्या आहेत. पण तुझ्या प्रत्येक चित्रपटात मला सुधारणा दिसून येत आहे. यात काही ना काही दडलेले आहे. तुम्ही किती चांगले व्हाल हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्हाला किती मेहनत करायची आहे,यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही काम करत रहाणं.'
आजही चिकाटी सोडली नाही..
अभिषेक बच्चनने अलीकडेच शेअर केले की तो कोणत्याही भूमिकेला सामोरे जाण्यावर लक्ष देतो.मग ती सहाय्यक, दुय्यम किंवा लहान का असेना.तो आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आजही चिकाटीने प्रयत्न करत असल्याचं सांगतो. त्याचा नवीन चित्रपट आय वॉन्ट टू टॉक, जो 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, वडील-मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा यात दाखवण्यात आली आहे. अभिषेकनं साकारलेल्या अर्जुन सेनच्या भूमिकेत एका भावनिक प्रवासाला सामोरे जातो. त्याचबरोबर ब्रीद: इनटू द शॅडोज या वेब सिरीजमधील त्याच्या प्रभावी कामगिरीने ओटीटी स्पेसमध्येही त्याची छाप सोडली आहे.