एक्स्प्लोर

एक कोटी गुंतवले, 114 कोटी मिळवले, बिग बी मालामाल

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, या व्यवहारानंतर मेरिडिअन टेकमध्ये अमिताभ आणि अभिषेकला लाँगफिन कॉर्पचे तब्बल 25 लाख शेअर्स मिळाले.

मुंबई : महानायक अमिताभ बच्चनने 2015 मध्ये मुलगा अभिषेक बरोबर आपल्या खासगी गुंतवणुकीतून सिंगापूरच्या मेरिडिअन टेक पीटीई कंपनीत 1 कोटी 60 लाख रूपये गुंतवले. व्यंकट श्रीनिवास मीनावल्ली यांच्या मालकीच्या या कंपनीबद्दल फारशी माहितीही नव्हती. पण मेरिडिअनची उप कंपनी असलेली जिद्दू डॉट कॉम ही कंपनी लाँगफिन कॉर्पने विकत घेतली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, या व्यवहारानंतर मेरिडिअन टेकमध्ये अमिताभ आणि अभिषेकला लाँगफिन कॉर्पचे तब्बल 25 लाख शेअर्स मिळाले. सोमवारी नेसडॅक या अमेरीकन शेअरबाजारात लाँगफिनच्या एका शेअरची किंमत 70 डॉलर होती. म्हणजेच 2015 साली 1 कोटी 60 लाख रुपये गुंतवले आणि 2017 मध्ये अमिताभ यांना परतावा मिळाला.. तब्बल 114 कोटी... म्हणजेच गुंतवणुकीचा परतावा मिळाला... जवळपास 75 पट. अमिताभ यांनी गुंतवणूक केलेली कंपनी ही क्लाउड स्टोरेज आणि ई डिस्ट्रीब्यूशनमधली स्टार्टअप साईट होती. पण डिसेंबर 2017 मध्ये ही कंपनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एम्पावर्ड सोल्यूशन प्रोव्हायडर झाली होती. जी जगभरातल्या क्रीप्टोकरन्सीचा उपयोग करून मायक्रोफायनान्स करत होती. ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या जादूमय शब्दांनी अशी काही कमाल केली, की गेल्या बुधवारपासून सोमवारपर्यंत कंपनीचा शेअर तब्बल हजार पटीने वाढला. याच आठवड्यात जिद्दू कंपनीच्या खरेदीचा व्यवहार झाल्यावर तर ही वाढ किंमत अडीच हजारपटीने वाढली आणि बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरंसीच्या नावसाधर्म्याने अमिताभ आणि अभिषेक हे बच्चन पितापुत्र दोन वर्षात अक्षरशः मालामाल झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget