Allu Arjun : ‘ये भारत का तिरंगा है, कभी झुकेगा नही!’, न्यूयॉर्कमधील ‘इंडिया डे’ परेडमध्ये दिसला अल्लू अर्जुनचा स्वॅग!
Allu Arjun : न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या वार्षिक इंडियन डे परेडमध्ये (NYC Indian Day Parade) अल्लू अर्जुनने भारताचे प्रतिनिधित्व केले.
Allu Arjun : साऊथ स्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या वार्षिक इंडियन डे परेडमध्ये (NYC Indian Day Parade) अभिनेत्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. भारत देश यंदा आपल्या स्वातंत्र्याचे 75वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्याचवेळी एक भारतीय अभिनेता जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. या मेगा परेडमध्ये दिसल्यापासून अल्लू अर्जुन सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. भारताचा गौरव करणारी ही परेड अल्लू अर्जुन आणि सगळ्या भारतीयांसाठी खूप खास ठरली आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 'पुष्पा: द राईज' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर, अभिनेता सध्या या चित्रपटाच्या भाग 2 अर्थात 'पुष्पा: द रुल'साठी चर्चेत आहे. यादरम्यानेच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो तिरंगा परेडमध्ये सहभागी होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डीसह (Sneha Reddy) न्यूयॉर्क येथे परेडमध्ये सहभागी झाला होता. व्हिडीओमध्ये तो हातात राष्ट्रध्वज फडकावताना दिसत आहे. अल्लू अर्जुनने केवळ परेडमध्ये भाग घेतला नाही, तर त्याला ग्रँड मार्शल या पदवीनेही गौरवण्यात आले. व्हिडीओमध्ये उल्लू अर्जुन पांढऱ्या कुर्त्यामध्ये, तर स्नेहा रेड्डी पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. ओपन-टॉप गाडीतून तिरंगा फडकावत त्यांनी या परेडमध्ये सहभाग घेतला.
अल्लू अर्जुनचा सन्मान
अल्लू अर्जुनने काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याला न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांच्याकडून प्रमाणपत्र प्रदान केले जात असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी अल्लू अर्जुनने न्यूयॉर्कच्या महापौरांना पुष्पा राजची हूक स्टेप देखील दाखवली आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘न्यूयॉर्क शहराच्या महापौरांना भेटून आनंद झाला. अतिशय स्पोर्टी व्यक्तिमत्त्व. या सन्मानासाठी धन्यवाद मिस्टर एरिक अॅडम्स.’
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ स्वॅग!
‘ये भारत का तिरंगा है, कभी झुकेगा नही’, असे म्हणत या परेडदरम्यान लोकांना संबोधित करताना अल्लू अर्जुनचे देशाबद्दलचे प्रेम आणि आदर दिसून आला. न्यूयॉर्कमधील या इंडिया डे परेडमध्ये सुमारे 5 लाखांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती. या परेडमध्ये चाहते अल्लू अर्जुनच्या नावाचा जयजयकार करत होते. संपूर्ण परेडमध्ये अल्लू अर्जुनची क्रेझ दिसून येत होती.
संबंधित बातम्या