(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Allu Arjun Pushpa 2 : 'पुष्पा : द रुल'साठी अल्लू अर्जूनने वाढवली फी; भाग 1 च्या दुप्पट किंमतीत करणार काम
Allu Arjun Pushpa 2 : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या आगामी 'पुष्पा पार्ट 2' चित्रपटासाठी फी वाढवली आहे.
Allu Arjun Pushpa 2 : साउथ सिनेसृष्टीतील दिग्गज अल्लू अर्जुन (Allu Arjun) उर्फ पुष्पाची (Pushpa) क्रेझ सध्या खूप वाढली आहे. पुष्पा पार्ट वनच्या (Pushpa Part 1) प्रचंड यशानंतर निर्माते पुष्पा : द रुलच्या (Pushpa : The Rule) तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा पार्ट 2 साठी फी वाढवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असे सांगितले जात आहे की रील लाइफ पुष्पा आता पहिल्या भागाच्या दुप्पट किमतीत पुष्पा 2 चित्रपटात काम करणार आहे.
अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी फी वाढवली?
विशेष म्हणजे पुष्पा : द राइज (Pushpa : The Rise) हा अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. यासोबतच अल्लूच्या दमदार अभिनयाचेही सर्वांनी कौतुक केले आहे. अशा स्थितीत अल्लु पुष्पा : द रुलची फी वाढविणे साहजिक होते. असंच काहीसं घडलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 1 च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या भाग 2 साठी 85 कोटी रुपये शुल्क आकारले आहे. रिपोर्ट्सनुसार, अल्लूने पुष्पाच्या पहिल्या भागासाठी 30-40 कोटी रुपये घेतले होते. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन पुष्पा 2 साठी दुप्पट फी घेणार आहे.
पुष्पा : द रुलचे शूटिंग कधी सुरू होणार?
पुष्पा 1 च्या भरघोस यशानंतर निर्माते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पुष्पा : द रुल म्हणजेच भाग 2 चे शूटिंग सुरू करू शकतात. पुष्पा पार्ट 2 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) पुन्हा एकदा साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत धमाल करताना दिसणार आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती आहे. यासोबतच प्रेक्षकांना आतापासूनच पुष्पाच्या सिक्वेलची उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushmita Sen, Lalit Modi : ‘लेकीने काही सांगितलंच नाही!’, सुष्मिता सेन-ललित मोदींच्या नात्यावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया...
- Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!
- Rangbaaz 3 : ‘रंगबाज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता विनीत कुमार झळकणार मुख्य भूमिकेत!