एक्स्प्लोर
VIDEO : आलियाला करायचंय रणबीरशी लग्न
सध्या आलिया-रणबीर बऱ्याचदा एकमेकांविषयी बोलताना दिसत आहेत. एका व्हिडीओत आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न करायचं आहे, असं म्हटलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लव्हलाईफ सध्या चांगलीच चर्चेत आहे. रणबीर आणि आलियाची जोडी त्यांच्या चाहत्यांनाही पसंत पडली आहे. आलिया-रणबीर बऱ्याचदा एकमेकांविषयी बोलताना दिसत आहेत. एका व्हिडीओत आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न करायचं आहे, असं म्हटलं आहे.
आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ बराच जुना आहे. सध्या रणबीर-आलिया यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या चौथ्या सीजनमधील हा व्हिडीओ आहे. अलियासोबत परिणीती चोप्रा देखील या कार्यक्रमात दिसत आहे. या कार्यक्रम आलियाने रणबीरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रणवीरच्या वडिलांना याबाबत सांगितलं का? नीतू कपूर, कटरिना कैफ यांना तुमच्या फ्युचर प्लॅनबद्दल माहिती आहे का? असा प्रश्न करणने विचारला होता. तेव्हा रणबीरसोडून सगळ्यांना माझा प्लॅनबद्दल माहीत असल्याचे आलियाने करणला सांगितलं होतं.
'रॉकस्टार' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आलिया पहिल्यांदा रणबीर कपूरशी बोलली होती, असं आलियाने यावेळी सांगितलं. करणने रणबीरला फोन लावून आलियाचं त्याच्याशी बोलणं करून दिलं होतं. 'कॉफी विथ करण'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
यावर्षी रणबीरचा 'संजू' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. तर आलियाच्या 'राजी'लाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. रणबीर आणि आलिया सध्या बुल्गारियामध्ये त्यांच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement