एक्स्प्लोर
गेल्या 30-40 वर्षांत असा ट्रेलर कुणी पाहिला नसेल, 'रुस्तम'चा हटके ट्रेलर
![गेल्या 30-40 वर्षांत असा ट्रेलर कुणी पाहिला नसेल, 'रुस्तम'चा हटके ट्रेलर Akshay Kumars Rustom Radio Trailer Launched गेल्या 30-40 वर्षांत असा ट्रेलर कुणी पाहिला नसेल, 'रुस्तम'चा हटके ट्रेलर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/04145936/Rustom-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा अत्यंत हटके पद्धतीने लॉन्च करण्यात आला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांत कोणत्याही सिनेमाची अशा पद्धतीने घोषणा झाल्याचे तुम्ही पाहिले नसाल. रुस्तम सिनेमाचा ट्रेलर रेडिओवरुन लॉन्च करण्यात आला होता. कदाचित, रुस्तम हा पहिला सिनेमा असेल, ज्याने अशी अनोखी पद्धत अवलंबली आहे.
रुस्तम सिनेमाच्या ट्रेलरचं सरप्राईज इथेच संपत नाही. रुस्तमच्या ट्रेलरला अशा व्यक्तीने आवाज दिला आहे, ज्याच्या आवाजाने 60 च्या दशकात अनेकांच्या हृदयावर राज्य केलं. अर्थात अमीन सयानी साहेब. 60 च्या दशकात सयानी साहेबांचा आवाज ऐकण्यासाठी लोक तासंतास रोडिओ लावून बसत असत.
रेडिओ ट्रेलरच्या माध्यमातून अक्षय कुमार सर्व वयोगटातील सिनेरसिकांपर्यंत पोहोचू पाहतो आहे. अत्यंत अनोख्या पद्धतीने ट्रेलर लॉन्च करुन अक्षय कुमारने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अक्षय कुमारचा रुस्तम सिनेमा येत्या 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे.Let me take you back,back to the time of my crime! Presenting the #RustomRadioTrailer, can you guess the voice?https://t.co/FlDrJfJI9G
— Akshay Kumar (@akshaykumar) July 4, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)