एक्स्प्लोर

Akshay Kumar : ‘भाषा’ वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला ‘इंग्रजांनी आपल्यात फूट पाडली...’

Akshay Kumar : 'पृथ्वीराज'मध्ये अक्षय कुमारसह सोनू सूद, संजय दत्त आणि माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

Akshay Kumar : बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुरू असलेल्या वादात आता भाषेवरून वाद सुरू झाला आहे. प्रसिद्ध साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) यांच्यात हिंदी भाषेवरून झालेल्या वादावर आता अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमार म्हणाला की, जेव्हा कोणी फिल्म इंडस्ट्रीला साऊथ आणि नॉर्थच्या नावाने संबोधतो, तेव्हा त्याला अजिबात आवडत नाही. पुढे तो म्हणाला की, इंग्रजांनी देशाची फाळणी करून आपल्यावर राज्य केले, पण यातून आपण काही धडा घेतला नसल्याचे अशावेळी दिसून येते. ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले.

'पृथ्वीराज'मध्ये अक्षय कुमारसह सोनू सूद, संजय दत्त आणि माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  मानुषी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षयचा नवा चित्रपट 'पृथ्वीराज' 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'पृथ्वीराज' हा भारतीय योद्धा राजा पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत आहे.

आपण सर्व एक आहोत!

भाषा वादावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अक्षयने म्हटले की, ‘माझा या विभागणीवरच विश्वास नाही, जेव्हा कोणी साऊथ इंडस्ट्री किंवा नॉर्थ इंडस्ट्री म्हणतं, तेव्हा मला त्यांचा राग येतो, आपण सर्व एक इंडस्ट्री आहोत. मला वाटते की, आपण आता हा प्रश्न विचारणेच थांबवले पाहिजे.’

मला सगळ्या चित्रपटांमध्ये काम करायचेय!

अक्षय पुढे म्हणाला, 'इंग्रज आले आणि आपल्यात फूट पाडून गेले, त्यांनी आपल्यावर राज्य केले. पण आता असे वाटते की, आपण यातून काहीच धडा शिकलो नाही, आपल्याला ते अजूनही समजले नाही. ज्या दिवशी आपल्याला समजेल की, आपण सर्व एक आहोत, तेव्हा मला वाटते की गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे होतील. 'पॅन-इंडिया' चित्रपट आणि ते सगळं, हे शब्द माझ्या समजण्यापलीकडचे आहेत, मला फक्त सर्व चित्रपटांनी काम करायचे आहे आणिप्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.'

संबंधित बातम्या

Dhaakad Vs Bhool Bhulaiyaa 2 : कंगना आणि कार्तिकची बॉक्स ऑफिसवर टक्कर, ‘धाकड’ विरुद्ध ‘भुलभुलैया 2’! कोण मारणार बाजी?

Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : बॉलिवूडला पुन्हा एकदा पायरसीचा फटका! रिलीजच्या अवघ्या काही तासांतच ‘धाकड’, ‘भूलभुलैया 2’ लीक!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget