एक्स्प्लोर
अजय, काजोल नव्हे, तर 'ही' सांभाळते अजयचा सोशल मीडिया
मुंबईः अभिनेता अजय देवगण सोशल मीडियावर फार सक्रिय नसणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र अजय देवगण सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसत आहे. अजयची मुलगी न्यासा या मागचं कारण आहे. न्यासा वडिलांचं ट्विटर अकाऊंट सध्या सांभाळत असल्याचं दिसत आहे.
न्यासा सध्या केवळ 13 वर्षांची आहे. मात्र तिने आपल्या या वयातच वडिलांच्या लाखो फोलोअर्स असलेल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर खेळणं सुरु केलं आहे. न्यासा वडिलांच्या अकाऊंटवरुन सध्या अनेक पोस्ट शेअर करत आहे.
ट्विटर इंस्टाग्रामवर पोस्ट
अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत आहे. यापूर्वी अजय देवगण केवळ आपल्या सिनेमांविषयी माहिती देण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असे. मात्र अजय अचानकच सोशल मीडियावर सक्रिय झाल्यामुळे चाहते देखील चांगलेच खूश झाले आहेत.
चाहत्यांचा रिप्लाय देण्याचा हा उत्साह खरं तर अजयची मुलगी न्यासाने आणला आहे. न्यासा वेगवेगळ्या गोष्टी सध्या शेअर करत आहे. न्यासाने नुकतंच आपण वडिलांसोबत एका कार्यक्रमात जात असल्याचं ट्वीट केलं होतं.
https://twitter.com/ajaydevgn/status/752755662657028096
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement