एक्स्प्लोर
Advertisement
बॉक्स ऑफिसवर पुन्हा क्लॅश, 'अय्यारी'चं 'पॅडमॅन'ला ट्वीट
पद्मावत सारख्या तगडी सिनेमाशी स्पर्धा करुन नुकसान होण्याच्या भीतीने पॅडमॅननेही दोन आठवडे पुढे उडी मारली.
मुंबई : अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट काही केल्या नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' सिनेमाची पाठ सोडताना दिसत नाही. बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी'ने तारीख बदलली, मात्र आता 'पॅडमॅन'नेही तारीख बदलून अय्यारीने निवडलेलीच रीलीजिंग डेट ठरवली आहे. यावर डोक्यावर हात मारुन घेत 'अय्यारी'ने 'पॅडमॅन'ला ट्वीट करुन अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'अय्यारी' हा चित्रपट यंदा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजे 26 जानेवारी 2018 रोजी रीलिज करण्यात येणार होता. मात्र अक्षयचा पॅडमॅन आणि रजनीकांतचा 2.0 (कोणे एके काळी ठरलेली रीलीजिंग डेट) यांनीही हाच दिवस निवडला. यथावकाश रजनीचा 2.0 ही एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला.
त्याचवेळी संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती'चं घोंगडं भिजत होतं. अखेर 'पद्मावती'चं पद्मावत झालं आणि 25 जानेवारीला हा सिनेमा रीलिज होण्याचं निश्चित झालं. या दोन चित्रपटांसोबत टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी'कार नीरज पांडेंनी सामंजस्याने आपलं बस्तान हलवलं.Good to have you back! See you on 09.02.18 https://t.co/prvWV1BobJ
— Aiyaary (@aiyaary) January 20, 2018
प्रजासत्ताक दिनी अक्षयच्या 'पॅडमॅन'ची नीरज पांडेशी टक्कर
अय्यारी 9 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित करण्याचं ठरलं. त्यामुळे 26 जानेवारीला पद्मावती विरुद्ध पॅडमॅन, तर 9 तारखेला अय्यारी आणि सोनू के टिटू की स्वीटी, अशी स्थिती होती. मात्र पद्मावत सारख्या तगडी सिनेमाशी स्पर्धा करुन नुकसान होण्याच्या भीतीने पॅडमॅननेही दोन आठवडे पुढे उडी मारली. अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अय्यारी हा चित्रपट सैन्याचे एक अधिकारी आणि त्यांच्या शिष्यावर आधारित आहे. मनोज बाजपेयी सैन्याच्या अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असून सिद्धार्थ मल्होत्रा शिष्याच्या भूमिकेत आहे.प्रजासत्ताक दिनी ‘पॅडमॅन’ विरुद्ध ‘पद्मावती’ टक्कर
पॅडमॅन हा चित्रपट गरीब महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अक्षय यात मुख्य भूमिकेत असून सोनम कपूर आणि राधिका आपटे त्याच्यासोबत दिसणार आहेत. यापूर्वी, नीरज पांडेच्या स्पेशल 26 मध्ये अक्षय मनोज बाजपेयींसोबत झळकला होता. तर ब्रदर्स सिनेमात अक्षय आणि सिद्धार्थ यांनी स्क्रीन शेअर केली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement