Adipurush Teaser: 'अरे हा तर व्हिडीओ गेम', 'खराब VFX'; आदिपुरुषच्या टीझरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या टीझरमधील VFX ला ट्रोल केलं आहे.
Adipurush Teaser: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) रिलीज झाला. अयोध्येत या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाची प्रभासचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं असून प्रभाससोबतच अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) या कलाकांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या टीझरमधील VFX ला ट्रोल केलं आहे. काहींनी या टीझरची तुलना टेम्पल रन या गेमसोबत केली तर या टीझरमध्ये खराब VFX वापरण्यात आले आहेत, असं काहींचे मत आहे.
आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझरबाबत अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर केल्या आहेत. या ट्वीटमध्ये एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, 'खराब VFX, व्हिडीओ गेमसारखं दिसत आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'टेम्पल रन गेम वाटतं आहे.' रिपोर्टनुसार, आदिपुरुष या चित्रपटाच्या VFX साठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
#disappointed #Adipurush
— Aditya Sahu 🇮🇳🚩 (@adityasahu5th) October 2, 2022
Worst Level VFX
Looks like Video Game 😭 pic.twitter.com/tFqXbmQUEw
700 cr Temple Run🤣🤣😭#Adipurush #AdipurushTeaser #AdipurushMegaTeaserLaunch #Disappointed #Animated pic.twitter.com/fH4B6k55iv
— Prem Sharma (@imprem858) October 2, 2022
12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती ही सिता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी ओम राऊतचा तान्हाजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता आदिपुरुष या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: